गुन्हेगारी विश्वाला दणका। : सुनील वाघ हत्याप्रकरणी कुंदन परदेशीला जन्मठेप

राकेश कोष्टी, व्यंकटेश मोरे, जया दिवेसह सहा जणांना सश्रम कारावास
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
मखमलाबाद रोडवरील बहुचर्चित खून प्रकरणी न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. यात भेळ विक्रेता सुनील रामदास वाघ याचा खून व हेमंत रामदास वाघ याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. यात कुंदन सुरेश परदेशी यास जन्मठेप तर राकेश कोष्टी, व्यंकटेश मोरे, जया दिवे यांच्यासह सहा जणांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाने गुन्हेगारी विश्वाला चांगलाच दणका बसला आहे, गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोचवल्याबद्दल तपासी अधिकारी व त्यांच्या टीमचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान या खटल्यातील आरोपी अजय बागूल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय (क्रमांक ३) चे न्यायाधीश बी.व्ही. वाघ यांनी मंगळवारी दुपारी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे विशेष अभियोक्ता म्हणून पंकज चंद्रकोर यांनी पुरावा सदर करून आरोपींना शिक्षेप्रत पोहोचवले आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद रोडवरील मातोश्री मेडीकलसमोर भेळ विक्रेता सुनील व हेमंत  रामदास वाघ यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून प्राणघातक हल्ला झाला होता. यात सुनील याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयुर शिवराम कानडे, (रा. शारदा सरस्वती सोसायटी, मेहरधाम, पंचवटी), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (रा. दिव्यदर्शन सोसायटी, विसेमळा, कॉलेजरोड), मयुर गोपाल भावसार (रा. सिध्दकला रो-हाउस, मेहरथाम, पंचवटी), आकाश विलास जाधव (रा. मखमलाबाद, पंचवटी), करण रविंद्र परदेशी (रा. दळवी चाळ, खंडेराव मंदिराजवळ, मखमलाबाद रोड), कुंदन सुरेश परदेशी (रा. दळवी चाळ, हनुमानवाडी), अजय जेठा बोरीसा (रा. चैतन्य हौसींग सोसायटी, साईबाबा मंदिराशेजारी), अक्षय कैलास इंगळे (रा. शिवशक्ती अपार्टमेंट शेजारी, हनुमानवाडी), रविंद्र दगडूसिंग परदेशी (रा. हनुमानवाडी), अर्जुन रविंद्र परदेशी (रा. दळवी चाळ, खंडेराव मंदिराजवळ, मखलमलाबाद रोड), गणेश भास्कर कालेकर (रा. कालेकर चाळ, हनुमानवाडी), जयेश हिरामण दिवे (रा. एरंडवाडी, पेठफाटा), राकेश तुकाराम कोष्टी (रा. मनोज मेडीकल जवळ, विजयनगर, सिडको), व्यंकटेश नानासाहेब मोरे (रा. प्रिती अपार्टमेंट, मखमलाबाद रोड) किरण दिनेश नागरे (रा. पार्वती निवास, मखमलाबाद नाका), पवन शिवाजी कातकाडे (वय रा. चैतन्यप्रभा सोसायटी, साई पॅलेस हॉटेलजवळ, राणेनगर), रोहित आनंद उघाडे (रा. सहावी स्किम, उपेंद्रनगर, अंबड लिंक रोड), अजय दिलीप बागुल (रा. बागुल निवास, आर्दशनगर) यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक विजयकुमार चव्हाण, उपनिरीक्षक व्ही.एस. जोनवाल, आर.एस. नरोटे, बी.बी. पालकर, सहायक निरीक्षक ए.एम. मेश्राम यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून कुंदन सुरेश परदेशी यांस भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४८ व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट अन्वये जन्मठेपची व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर अक्षय कैलास इंगळे, रविंद्र दगडूसिंग परदेशी, जयेश हिरामण दिवे, राकेश तुकाराम कोष्टी, व्यंकटेश नानासाहेब मोरे किरण दिनेश नागरे यांना भादंवि कलम ३०७ मध्ये ०७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०१ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
अक्षय कैलास इंगळे, रविंद्र दगडूसिंग परदेशी, गणेश भास्कर कालेकर यांना भादंवि कलम ३२४ मध्ये ०२ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा.
—————————————————-
१५ साक्षीदार फितूर
भेळ विक्रेता सुनील रामदास वाघ याच्या हत्येमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. आरोपींमध्ये अजय बागूल यांचा समावेश होता. त्यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे तसेच अँड. चैतन्य देशमुख, सूरज मंत्री यांनी युक्तीवाद केला. बागूल यांची मुक्तता करण्यात आली आहे.  दरम्यान या खटल्यातील प्रमुख साक्षीदारांपैकी १५ जण फितूर झाल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात गर्दी उसळली होती.
Bhagwat Udavant

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

15 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

15 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

15 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

15 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

15 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

16 hours ago