नाशकात दोन दिवशीय वेदशास्त्र महापरिषद

नाशिक : प्रतिनिधी
महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक, दक्षिक्षरम्नाय श्री जगदगुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्‍व विद्यालय रामटेक, नागपूर आणि वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन विभाग ऑरो विश्‍व विद्यालय, सूरत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद वाक्यार्थ सभा व राष्ट्रीय वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दिनांक 13 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे.
गोपाल मंगल कार्यालय सरदार चौक, पंचवटी येथे या समारंभाचे उदघाटन होणा आहे. दिनांक 14 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रीय वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण सोहळा कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूर नाका येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन नागपूरच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्‍व विद्यालय रामटेकचे कुलगुरु डॉ. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आणि पंडीतराज वेदशास्त्र संपन्न गणेश्‍वर शास्त्री द्रविड गुरुजी वाराणसी यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी 4 वाजता वैदिक संहिता व जनसंज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात प्रा. हरे राम त्रिपाठी, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे हे सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दिनांक 14 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात चतुर्वेद पठण व वाक्यर्थ सभा होणार आहे. या सभेत वेदाचार्य गणेश्‍वर शास्त्री, मधुसुदन पेंना, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, प्रसाद गोखले, राजेश्‍वर शास्त्री देशमुख, संदीप जोशी, प्रतिक जोशी, रामचंद्र टाकळकर, सौरभ कुलकर्णी सहभागी होतील. दुपारी 2 वाजता ज्ञानेश्‍वरीतील वैदिक सूत्रे व जनसंवाद सभा होणार आहे. धर्मभूषण गौरीशंकरजी बंगळुरू यांच्या स्मरणार्थ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सन्मान सोहळा सायंकाळी 5 वाजता दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वेदाचार्य रवींद्र पैठणे, हभप दत्तात्रेय पैठणे, गोविंद पैठणे, रामगोपाल अय्यर, रामगोपाल अय्यर, वेदमूर्ती हरिष जोशी यांनी केले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago