नाशिक

नाशिक जिल्ह्यात इंधन साखळी सुस्थितीत; टंचाईची स्थिती नाही

नाशिक : विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यात इंधन पुरवठा साखळी सुस्थितीत असून, शहर व जिल्ह्यात टंचाईची कोणतीही स्थिती नाही. नाशिक जिल्ह्याला प्रामुख्याने मनमाडजवळील पानेवाडी येथील इंधन डेपरमधून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि एचपी कंपन्यांचा पुरवठा केला जातो. हा डेपो केवळ नाशिकसाठीच नाही, तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अनेक भागांसाठी ’लाइफलाइन’ आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, नाशिकमध्ये इंधनाची प्रत्यक्ष कमतरता नाही, तर वितरणाचे नियोजन कडक करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी खतपुरवठा सुरक्षित करण्यासाठी सरकारने ’बफर स्टॉक’ आधीच तयार केला आहे. त्यादृष्टीने नाशिकमध्ये खतपुरवठाही सुरळीत मार्गी लावण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केलेले आहे.
मार्चअखेरीस इंधन टंचाईच्या अफवांनी नाशिक शहरातील सुमारे 60 टक्के पेट्रोलपंप कोरडे पडले होते. मात्र, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित
आहे.
पानेवाडी डेपोतून होणारी टँकरची वाहतूक पोलीस संरक्षणात आणि सातत्याने सुरू आहे. सध्या जिल्ह्यात 550 हून अधिक पेट्रोलपंप कार्यरत असून, केवळ ’पॅनिक बायिंग’ (घाबरून जादा खरेदी करणे)मुळे काही काळ तुटवडा जाणवला होता. प्रशासनाने साठेबाजी रोखण्यासाठी ’डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (डीएसी) अनिवार्य केला आहे. पुरवठ्यावर दररोज दुपारी एक वाजेपर्यंत देखरेख ठेवली जात आहे.
यांत्रिकीकरण : डिझेलच्या किमती वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी नांगरणी, मशागत आणि काढणी या कामांचे दर एकरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्या भागात वीज उपलब्ध नाही, तिथे डिझेलपंपांवर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांच्या सिंचन खर्चात मोठी भर पडली आहे.

प्रशासकीय पावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोलियम कंपन्यांसोबत समन्वय साधून, शेतीकामांसाठी लागणार्‍या डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार नाही, याची ग्वाही दिली आहे. ग्रामीण भागात खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Fuel chain in good condition in Nashik district; no shortage situation

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago