लासलगाव : प्रतिनिधी
लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील टाकळी(विं)शिवारात असलेल्या देशी दारूच्या दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यानी तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानात विक्रीसाठी असलेल्या १ लाख ४२ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना शुक्रवार व शनिवार रात्रीच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील टाकळी(विं)शिवारात ऋषिकेश देशी दारूचे दुकान आहे.या प्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक फिर्यादी सतीश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री दहा व शनिवार सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या देशी दारूच्या दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानात विक्रीसाठी असलेल्या अंदाजे १ लाख ४२ हजार रुपये किमतीचे देशी दारूचे ४६ बॉक्स चोरुन पोबारा केला.
या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नवनाथ नाईकवाडे व उत्त्तम गोसावी करत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…