नाशिक

प्रचारात गाजणार तपोवन, गुन्हेगारी, खड्डे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मनपाच्या निवडणुकीत रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जागावाटपाची ओढाताण आणि उमेदवारी पटकवण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. काही पक्षांनी एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. तर काही पक्षांमध्ये अजूनही जागावाटपावरून घमासान सुरू आहे. मात्र, एकदा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराला खरी रंगत येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तपोवनाचा मुद्दा आणि गुन्हेगारी हे हॉट विषय ठरणार आहेत.


कोणतीही निवडणूक असली की प्रचारात अनेक मुद्दे समोर येतात. या मुद्यांभोवतीच प्रचार फिरत असतो. सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधकांकडूनही याच मुद्यांंवर भर देऊन मतदारांचे लक्ष वेधले जाते. मागील वेळेस ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दत्तक घोषणेचा परिणाम होऊन नाशिककरांनी मनसेची सत्ता उलथवत भाजपाला बहुमत दिले होते. यंदाची मनपा निवडणूक तपोवनातील वृक्षतोड, गुन्हेगारी, खड्डेमय नाशिक, पदाधिकारी फोडाफोडी, पालकमंत्रिपद न नेमणे या मुद्याभोवती फिरण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा शिवसेनेला या मुद्यावर घेरण्याची रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे.
तपोवनाच्या मुद्द्यावरून नाशिक शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, राजकीय पक्ष यांच्यासह सामान्य नागरिकदेखील तपोवन वृक्षतोडीच्या विरुद्ध आक्रमक झाले आहेत. याच मुद्यावरून प्रचारात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस

नाशिक शहराच्या प्रत्येक मनपा निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये सामना रंगत असतो, हे मागील दोन निवडणुकीवरून दिसून आले. 2017 च्या मनपा निवडणुकीत नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. यात भाजपाने बाजी मारली होती. तर 2012 च्या मनपा निवडणूक तात्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगला होता. यात मनसेने जोरदार यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फडणवीस विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना रंगणार असून, यात कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

43 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago