नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने मालमत्ताधारकांकडील थकबाकी वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. प्रारंभी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत थकबाकी वसुलीसाठी 95 टक्के शास्ती माफी देण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून 75 कोटींची वसुली या तीन महिन्यांत झाली. दरम्यान, 1 डिसेंबरपासून शास्तीवर 85 टक्के सवलतीला सुरुवात झाली. मात्र, नाशिक महापालिकेची निवडणूक लागल्याने करवसुली मंदावली आहे. याचे कारण म्हणजे 1 ते 22 डिसेंबरदरम्यान महापालिकेच्या तिजोरीत अवघी चार कोटी 27 लाख 14 हजार 48 रुपये रक्कम जमा झाली आहे.
सध्या महापालिकेसमोर नऊशे कोटींच्या थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर तीन महिन्यांत 75 कोटी 61 लाख 74 हजारांची वसुली झाली. यात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांतच प्रत्येकी 28 कोटींची वसुली झाली होती; परंतु नोव्हेंबरपासून कर विभागातील कर्मचार्यांवर निवडणुकीची कामे लादल्याने वसुलीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नोव्हेंबरमध्ये वसुलीचा आकडा 18 कोटींवर येऊन अडकला. डिसेंबरपासून थकबाकीवर 85 टक्के सूट दिली जात आहे. नाशिक महापालिकेची शास्तीची थकबाकी सव्वातीनशे कोटींवर गेली आहे. याकरिता दरवर्षी अभय योजनेद्वारे जुन्या थकबाकीवर 95 टक्के सूट दिली जात आहे. शहरात घरपट्टीचे एकूण पाच लाख 83 हजार मिळकतधारक आहेत. पण यातील करदात्यांकडे चालू मागणीसह शास्तीची थकबाकी पडून आहे. सद्यःस्थितीत नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक कामामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. तो डिसेंबरमध्येही तसाच असून, निवडणुकीची कामे 16 जानेवारीपर्यंत असल्याने वसुलीत कमालीची घट होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी थकबाकी वसूल करून त्यातून निधी उभारण्याचा उद्देश आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोेत घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल आहे. त्यातून मिळणार्या रकमेतून विकासकामे केली जातात. महापालिकेच्या रेकॉर्डवर पाच लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. दोन लाख 12 हजार पाणीपट्टीधारक आहेत. महापालिकेने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटपाचे काम पुण्याच्या संस्थेला दिले आहे. शहरात नवीन पाणीपट्टीधारक शोधण्याबरोबर बिल वाटपाचे काम सुरू आहे. मात्र, त्यातच मनपाच्या निवडणुकीच्या कामाकरिता कर विभागातील कर्मचार्यांची नियुक्ती केल्याने थकबाकी वसुली मोहिमेला खंड पडण्याची शक्यता आहे.
विभाग वसुली करदात्यांची संख्या
सातपूर 68 लाख 45 हजार 939 1,383
नाशिक पश्चिम 27 लाख 54 हजार 675 504
नाशिक पूर्व 65 लाख 83 हजार 531 1,275
पंचवटी एक कोटी 24 लाख 24 हजार 2,050
नवीन नाशिक 88 लाख 75 हजार 643 11,877
नाशिकरोड 52 लाख 29 हजार 1,167
एकूण 4 कोटी 27 लाख 14 हजार 48
Tax collection stalled due to election work; only four crores collected this month सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…