नाशिक

स्वस्थ कुटुंबाचे स्वप्न पुरुषांच्या सहभागाशिवाय अपूर्ण

आठ हजार महिलांच्या, तर केवळ 194 पुरुषांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

नाशिक ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कुटुंबनियोजन कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात आला. या मोहिमेचे यंदाचे घोषवाक्य स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न पुरुषांच्या सहभागातूनच साकार, असे होते; परंतु आकडेवारी काही वेगळेच सांगते आहे. महिलांच्या आठ हजार 170 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाल्या असून, त्या तुलनेत पुरुषांच्या केवळ 194 नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या आकडेवारीवरून अजूनही महिलांवरच शस्त्रक्रियेचा भार असल्याचे दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 अखेर आकडेवारीतून पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त आहे. सुरगाणा तालुक्यात 117 पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याखालोखाल पेठ तालुक्यात 57, दिंडोरीत सात, नाशिक- सहा, निफाड-दोन, बागलाण- दोन, मालेगाव- दोन, कळवण- एक आणि चांदवड, देवळा, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर येथे शून्य शस्त्रक्रिया, असे प्रमाण राहिले आहे.
या तुलनेत महिलांचे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण बागलाण- एक हजार 217, चांदवड- 312, देवळा- 289, दिंडोरी-397, इगतपुरी-346, कळवण- 555, मालेगाव- एक हजार 227, नांदगाव- 58, नाशिक- एक हजार 53, निफाड- 936, पेठ-182, सिन्नर- 589, सुरगाणा- 70, त्र्यंबकेश्वर- 114, येवला- 613 असे एकूण 7 हजार 958 आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेत बागलाण26,नांदगाव 69,नाशिक 34,येवला 83 असे 212 शस्त्रकिया एकूण 8 हजार 170 शस्त्रक्रिया 1 एप्रिल ते 31 नोव्हेबरपर्यत करण्यात आल्या.महिलांच्या आरोग्य तपासण्या, नियमित चाचण्या आणि उपचार यांमध्ये वाढ झाल्यामुळे शस्त्रक्रियांचा प्रमाणही वृद्धिंगत झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या महिलांचे हिमोग्लोबीन कमी आहे किंवा ज्यांची सिझेरियन शस्त्रक्रिया झाली आहे, अशा महिलांच्या पतींनी पुरूष नसबंदीचा पर्याय स्वीकारल्यास महिलांच्या आरोग्यावर अतिरिक्त ताण येत नाही. ही शस्त्रक्रिया बिन टाक्याची, सुरक्षित आणि फारसा त्रास न देणारी असल्याचा योग्य प्रचार व जनजागृती झाल्यास पुरूष नसबंदीचे प्रमाण निश्चितच वाढू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सुरगाणा, पेठमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण जास्त
जिल्ह्यात एकूणच पुरुष नसबंदीचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी काही विशिष्ट कालावधी आणि आदिवासी भागांत हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. विशेषतः जानेवारी ते मार्च या कालावधीत, तसेच होळीच्या सणानिमित्त गावाकडे येणार्‍या नागरिकांमुळे पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रयांमध्ये वाढ होते, अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवाहन केले. हाय रिस्क मातांची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही किंवा ज्या महिलांना हृदयाचा किंवा एखादा गंभीर आजार आहे, अशा महिलांच्या पतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी समुपदेशन केले जाते.
– डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी

The dream of a healthy family is incomplete without the participation of men.
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

3 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago