नाशिक प्रकरणातील दोषींवर टीसीएस करणार कठोर कारवाई

कंपनीच्या वार्षिक सभेत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केले स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी
नाशिक येथील टीसीएस बीपीओ युनिटमधील महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर सक्ती प्रयत्नांच्या प्रकरणाची टाटा समूहाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी (दि.9) झालेल्या टीसीएसच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात जो कोणी कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.
चंद्रशेखरन यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर अधिक बोलणे टाळेन; परंतु आम्हाला मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, कंपनीच्या अधिकृत ई-मेल्स किंवा इतर कोणत्याही माध्यमांद्वारे याविषयी कोणतीही औपचारिक तक्रार यापूर्वी प्राप्त झाली नव्हती. नाशिक युनिटमधील सर्व कर्मचार्‍यांना तपास अधिकार्‍यांसोबत मुक्तपणे बोलता यावे, याची आम्ही खात्री करत आहोत.
ते पुढे म्हणाले, की जर कंपनीच्या प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट (पॉश) यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या, तर ती प्रक्रिया अधिक मजबूत केली जाईल. जर कोणत्याही कर्मचार्‍याची चूक आढळली, तर कठोर कारवाई निश्चित आहे. याप्रकरणी औपचारिक तपासाचा अहवाल येण्याची आम्ही वाट पाहत असून, तपास यंत्रणांना आमचे पूर्ण सहकार्य आहे.
नाशिक प्रकरणाची पार्श्वभूमी
मार्च आणि एप्रिल-2026 मध्ये नाशिकमधील टीसीएस बीपीओ युनिटमध्ये काम करणार्‍या काही महिला कर्मचार्‍यांनी
त्यांच्या सहकार्‍यांवर आणि वरिष्ठ टीम लीडर्सवर विनयभंग, मानसिक छळ आणि स क्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर
भकरण्याचा .प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 40 दिवसांचे ‘अंडरकव्हर ऑपरेशन’ राबवून पुरावे गोळा केले होते. आतापर्यंत एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आले असून एचआर आणि डिलिव्हरी पार्टनर अश्विनी चैनानी, निदा खान यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. जून 2026 मध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या दुसर्‍या आरोपपत्रानुसार आणि ताज्या तपासातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार, मुख्य आरोपी दानिश शेख, तौसीफ अत्तर आणि निदा खान यांनी पीडित महिलांना हिंदू देव-देवतांची गाणी ऐकणे आणि मंदिरात जाणे थांबवण्यास सांगितले. आरोपी निदा खान हिने चौकशीदरम्यान कबूल केले आहे की, तिने पीडित महिलेला नमाज कसे पढायचे हे शिकवले होते आणि धार्मिक माहितीसाठी ती तिला तिच्या घरी घेऊन जात असे. आरोपींनी पीडित महिलेच्या बँक खात्याचे आणि युपीआय पिनचे तपशील मिळवून त्यांच्या आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवले होते.

टीसीएसची अंतर्गत चौकशी व उपाययोजना

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी टीसीएसने डेलॉयट आणि ट्रायलीगल या स्वतंत्र संस्थांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ही अंतर्गत चौकशी टीसीएसच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आरती सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. याशिवाय, तपासाचे निष्कर्ष तपासून पुढील कारवाईची शिफारस करण्यासाठी स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एका ’ओव्हरसाइट कमिटी’ची स्थापना करण्यात आली आहे.
– एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स

TCS to take strict action against those found guilty in the Nashik incident.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *