नाशिक

विहितगाव- वडनेर रस्ता भूसंपादनासाठी शेतकर्‍यांना टीडीआर

आ. सरोज आहिरे-आयुक्तांच्या बैठकीत निर्णय; बाजारमूल्याच्या दुप्पट दर मिळणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून विहितगाव-वडनेर-पाथर्डी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडून मोबदला कसा देणार यावरून संभ्रम होता. याप्रकरणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची सोमवारी (दि.16) मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी शेतकर्‍यांना सरकारी बाजारमूल्याच्या दुप्पट टीडीआर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी आ. आहिरे यांना सांगितले. दरम्यान, शेतकर्‍यांनी कागदपत्रे सादर करताच प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणासाठी मोजणीला सुरुवात केली जाणार आहे.
विहितगाव-वडनेर-पाथर्डी या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमदार सरोज आहिरे यांनी 4 एप्रिल रोजी विहितगाव येथे याप्रश्नी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांची बैठक घेत मतदारसंघातील शेतकर्‍यांचे नुकसान न होता, त्यांना चांगल्या प्रमाणात टीडीआर किंवा रोख मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्त खत्री यांनी आ. आहिरे यांना शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी मनपा मुख्यालयात आ. आहिरे यांची आयुक्तांसमवेत बैठक झाली. त्यावर चांगला टीडीआर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी त्यास संमती दिली आहे.
या बैठकीस नाशिकरोड राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम कोठुळे, अनिल हांडोरे, धनाजी कोठुळे, रवींद्र हांडोरे, माणिक कोठुळे, मुज्जफर सय्यद, मंगेश हांडोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी आ. आहिरे यांनी तोडगा काढल्यानंतर जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. मोजणी झाल्यानंतर लगेच शेतकर्‍यांना पक्का टीडीआर मिळेल. रस्ता रुंदीकरणामुळे परिसरातील विकासाचा आणखी विस्तार होणार आहे. टीडीआरसाठी शेतकर्‍यांना एकप्रकारे महापालिकेने रेड कार्पेट टाकलेले दिसत आहे.

शेतकरीहित लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न होता योग्य टीडीआर देण्यात यावा, अशी मागणी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली असता, त्यांनी ती मान्य केली. त्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी मोजणी करून शेतकर्‍यांना पक्का टीडीआर मिळेल. तसेच इतरही कामे मार्गी लागली जाणार आहेत.
– आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ
रस्ता रुंदीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार असून, शेतकर्‍यांना विकासासाठी चांगली संधी असेल. तसेच या परिसरात विकासाची व्याप्ती वाढेल.
– विक्रम कोठुळे, उपाध्यक्ष, नाशिकरोड राष्ट्रवादी काँग्रेस

खालील विषयही मार्गी लागणार

आ. सरोज आहिरे यांनी, मनपा आयुक्त खत्री यांच्याकडे देवळालीगाव येथील यशवंत मंडई जीर्ण झाली असून, ती नव्याने बांधावी. वडनेर येथील शाळेची दुरवस्था झाली असून, तिची दुरुस्ती व्हावी, पिंपळगाव येथील पाण्याच्या टाकीचा विषय मार्गी लावून विहितगाव येथील सिग्नलजवळ छोटा पूल (व्हाय डक) या विषयावर चर्चा झाली. आ. आहिरे यांनी मांडलेले मुद्दे लवकर सोडवले जातील, असे आश्वासन आयुक्त खत्री यांनी दिले.

 

Gavkari Admin

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

13 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

25 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

37 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

49 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

55 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

2 hours ago