नांदगांव / महेंद्र पगार
तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवार दि २८ रोजी दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला
आमोदे येथील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दिपक पगार हे शेत कामासाठी शेतात जात असताना त्यांना ही बाब निर्दशनास आल्यानंतर त्यांनीही ही माहिती आमोदे गावातील पत्रकार महेंद्र पगार यांना दिल्यानंतर पगार यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली यावेळी जवळपास दहा मोर मृत्यु मुखी पडल्याचे आढळुन आले,
वन विभागाचे आर एफ ओ चंद्रकांत कासार वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ , एन के राठोड ,आर के दौंड , वनपाल सुनील महाले,वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला,
सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत, मृत्य झालेल्या मध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे , मृत्य झालेल्या मोरांचा शेवविच्छेदन करण्यासाठी नांदगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत ,
|
|