| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च एप्रिल 2022चा निकाल नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक 17 जून दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळामार्फत मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार (दि 17 ) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च एप्रिल 2022 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील सदर माहितीची प्रिंट येता येणार आहे मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे दहावीचा नवीन निकाल येथे पाहता येणार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यामध्ये आठ लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर सात लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचे सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनच संधी श्रेणी आणि गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध असमाणार आहेत. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा अर्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 20 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत नंतर कळविण्यात येणार आहे
| |
www.maharesult.nic.in
http://sscresult.mkcl.org
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…