सिडकोतील भाजी मार्केटमध्ये कोयता फिरवत दहशत

सराईताविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको भागात असलेल्या शिवाजी चौक भाजी मार्केटमध्ये कोयता फिरवत दहशत माजवून मारहाण व तोडफोड केल्याची घटना सायंकाळी घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार अंबादास दांडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनकर आमान मूल्या (वय 37, रा. गामणे स्टेडियमसमोर, वासननगर, पाथर्डी फाटा) हे भाजीपाला घेऊन दुचाकीवरून त्यांच्या टपरीकडे जात असताना, शिवाजी चौक भाजी मार्केट परिसरात अंबादास दांडेकर याने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना अडवले. त्यानंतर दुचाकीवरून खाली पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, परिसरात गर्दी जमल्यानंतर दांडेकर याने हातातील कोयता फिरवत लोकांना ‘मध्ये आला तर कापून टाकेन,’ अशी धमकी देत त्याने भाजीविक्रेते, फळविक्रेते तसेच वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानदारांनी दुकाने बंद केली, तर अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला.
अंबादास दांडेकर याच्याविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.य ाप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

Terror by swinging sickles in the vegetable market in CIDCO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *