– अॅड. प्रतीक्षा चौधरी
गेले दोन-तीन दिवस इंस्टाग्राम व्हॉट्सअॅपवर जोरदार अख निर्मित 80 च्या काळातील फोटो एडिट करून ते पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यात कपल फोटो, सिंगल मुला-मुलींचे असे विविधरीत्या विविध ठिकाणी बनवलेले फोटो दिसत आहेत. या फोटोंनी का असेना, पण ते 80 च्या काळातल्या गोष्टींची आठवण झाली आणि ती मनापासून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटले. म्हातारी 80 च्या काळातला नसला तरी 90 च्या काळातील मुला मुलींनी त्या काळातली दुनिया ही सिनेमा टीव्हीद्वारे अनुभवली आहे. जसं की, सिनेमा हा ब्लॅक अँड व्हाइटमधून नुकताच रंगीबिरंगी दुनियेत पदार्पण झालेला काळ म्हणजे 80. त्या सिनेमांमध्ये एक वेगळीच जादू होती त्यावेळच्या दुनियेची प्रतिभा दाखवण्याची दाखवण्याची.
सादगीपूर्ण वेशभूषा, अर्थपूर्ण प्रेमकहानी आणि निसर्गरम्य परिसरातली ती गाणी ज्यांना आजही ऐकलं आणि अनुभवलं तर अनुभव हा सुंदरच असतो. त्या सिनेमातील विशेष भूषा ही विशेष आकर्षक असायचे आणि केशरचना ती तर अजूनच सुंदर. काही गाणे काही सिनेमे ही आयुष्यभर लक्षात राहून जातात त्या काळातील काही सिनेमे आणि गाणी आजही मनावर आधी राज्य गाजवतात.
उदाहरणार्थ- दिल चीज क्या है, आप जैसा कोइ, निले अंबर पे- यांचा सादरीकरण करणारे कलाकारदेखील अगदी मनापासून आपली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर गाजवत असत.
80 च्या सरते शेवटी माधुरी दीक्षित अनिल कपूर यांचे सिनेमे यायला सुरुवात झाली एक दोन तीन माय नेम इज लखन या गाण्याने तर पार सिनेमासृष्टी पासून ते सामान्य जनतेपर्यंत वेड लावून सोडले होते.त्यावेळच्या सिनेमांना निसर्गरम्य ठिकाणी केलेल्या गाण्यांचे शूटिंग हे अधिक आकर्षक असायचं सोज्वळ असायचं. आताच्या सिनेमांमध्ये तो प्रकार बघायलाच मिळत नाही फक्त पार्टी नाइट क्लब आणि एखादा अर्ध गाणं निसर्गात शूट केलं जातं.
पाण्याच्या गाण्यांंना कुठलेही अर्थ नसतात आणि एखादं गाणं अर्थपूर्ण असलंही तर ते काही काळाने लगेच विसरायला होतं. विचार सिनेमांप्रमाणे कलाकारांच्या मनातसुद्धा एक वेगळीच आपुलकी एकमेकांबद्दल होती. एका प्रसिद्ध कलाकाराबद्दल असे ऐकण्यात आलं होतं की ज्या कलाकारासोबत त्यांनी त्याचा रोल केलेला होता तो पुन्हा त्यांनी कधीच सहकलाकार म्हणून केला नाही, तर नेहमी त्या कलाकाराला बहीणच मानलं. परंतु आजच्या काळात ज्या कलाकाराला मुलगी किंवा बहीण हा रोल दिला जातो त्याच कलाकारांसोबत विवाह करायलादेखील मागेपुढे बघितले जात नाही.
आताच्या सिनेमात, आताच्या गाण्यात ती पूर्वीची कुठलीच कणभरही सर येत नाही. जग पुढे चालले तसं भावना आणि मनदेखील आधुनिक होत चाललेत. 80 च्या दशका प्रमाणेच अगदी 90 आणि 70 च्या दशकातलीसुद्धा काही गोष्टी आजही सर्वांसाठी विशेषण आहेत आणि त्या काळातल्या ज्याही गोष्टी आहेत त्या आजही मनावर अधिराज्य गाजवत आहेत मग ते सिनेमा असो, कलाकार असो की, त्या वेळेचा काळ असो.
फुलांच्या सजवलेल्या सायकलपासून ते छानशा मोटारगाडीपर्यंतचा हा सुंदर काळ. मराठी सिनेमासृष्टी त्यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचं अधिराज्य होतं. ’बनवाबनवी’पासून ’झपाटलेला’पर्यंत लोकांना अगदी वेडावून सोडणारा हा मराठी सिनेमासृष्टीचा काळ.
तात्या विंचूसारख्या त्या बाहुल्याचा आजही अनेकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा सिनेमा आणि काळ म्हणजे 80ड. शेवटी एवढंच म्हणावसं वाटेल, जर कधी आयुष्यात एकांतवास वाटला किंवा नैराश्य वाटलं तर आवर्जून ही जुनी गाणी ऐकावीत. तो जुना काळ अनुभवावा आणि जुनं साधं आयुष्य जगून बघावं. अतिशय सुंदर वाटेल. तशी म्हणसुद्धा आहे- जुनं ते सोनं!
That evergreen era of the 80s.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…