नाशिक

मोहिमेत तपासले रिक्षाचालकांचे मराठी भाषेचे ज्ञान

आरटीओकडून शहरात 21 दिवसांत 1,089 वाहनांची तपासणी

पंचवटी : प्रतिनिधी
राज्य शासनाने रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य केल्यानंतर नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकांद्वारे 1 ते 21 मेदरम्यान नाशिक शहरातील विविध भागांत एक हजार 89 रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही, हे तपासण्यात आले. याचबरोबर रिक्षाची कागदपत्रे, योग्यता प्रमाणपत्र, गणवेश आदी बाबीदेखील तपासण्यात आल्या.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करणार्‍या प्रवाशांशी परप्रांतीय किंवा अमराठी चालकांमुळे चालकांचा संबंध येतो. अनेकदा संवाद साधताना प्रवाशांची गैरसोय होते. हाच सुसंवाद अधिक सुदृढ करण्यासाठी राज्य शासनाने मोटार वाहन नियमात बदल करत हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक सेवा वाहन चालविणार्‍या चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
राज्याच्या परिवहन आयुक्तांनी हा प्रस्ताव गृहविभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे. नवीन प्रस्तावित बदलांनुसार, आता परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील आणि विशेषतः नाशिकमधील रिक्षा व टॅक्सीचालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे भाग पडणार आहे.

तपासणीत पाहिल्या जातात या बाबी
मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान : अमराठी चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान (बोलणे आणि समजणे) आहे की नाही, याची जागेवरच खात्री केली जात आहे.
परवाना व बिल्ला : चालकाकडे वैध परवाना आणि आरटीओचा अधिकृत बिल्ला आहे का, याची तपासणी केली जाते.
गणवेश : रिक्षाचालक विहित गणवेशात आहेत की नाही हेही बघितले जाते.

परमिट विभाग
रिक्षा परवान्यासाठी अर्ज दाखल करणारे व त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार   –  70
वायुवेग पथक, इंटरसेप्टर पथकाकडून एकूण वाहन
तपासणी   – 750
लायसन्स विभाग बॅजधारक   – 89
योग्यता प्रमाणपत्रासाठी ऑटो रिक्षावाहन चालक  – 180
एकूण वाहने – 1,089

15 ऑगस्टची मुदत; अन्यथा कारवाई
परिवहन विभागाने अमराठी रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत चालकांनी मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. 16 ऑगस्टनंतर जे चालक नियमांचे उल्लंघन करताना आढळतील किंवा ज्यांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसेल, अशा चालकांवर आरटीओकडून दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

वायुवेग व इंटरसेप्टर पथके तैनात
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या मोहिमेसाठी विशेष वायुवेग व इंटरसेप्टर पथके तैनात केली आहेत. शहरातील मुख्य चौक, रिक्षा थांबे आणि गर्दीच्या ठिकाणी शनिवारी दिवसभर ही तपासणी मोहीम सुरू होती. केवळ परवान्यांची कागदपत्रे न तपासता, चालक प्रवाशांशी आणि अधिकार्‍यांशी मराठीत बोलतात की नाही, याची तपासणी केली जात होती.

The campaign tested the knowledge of Marathi language of rickshaw drivers.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago