सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड परिसरातील दुर्गानगर येथे अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करत तब्बल 7 लाख 35 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब बन्शी लांडगे (वय 40, रा. मोहिनी अपार्टमेंट, दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक) यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची घोटी, ओमपान पेंडंट, गंठण, लॉकेट, अंगठ्या, कानातले, झुंबर आदी दागिन्यांचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत 7 लाख 35 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पुढील तपास करीत आहेत.
Flat broken into, jewellery worth Rs 7.5 lakhs stolen
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…