राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कायदेशीरच

दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
दिल्ली उच्च न्यायालयाने हवामान आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणस्थळावरून सक्तीने रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्य ठरवले आहे. वांगचुक यांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. या कारवाईला आव्हान देणार्‍या आणि याला ‘बेकायदेशीर अटक’ म्हणणार्‍या दाव्यांवर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही नागरिकाच्या जिवाचे रक्षण करणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत वांगचुक यांना उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्याचा सरकारचा निर्णय त्यांच्या कायदेशीर अधिकारक्षेत्रात होता.
न्यायालयाने आपल्या निर्णयात हे अधोरेखित केले की, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार लोकशाहीत मान्य असला, तरी उपोषणकर्त्याच्या जिवाला थेट धोका निर्माण झाल्यास प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. वांगचुक यांच्या सततच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि आवश्यक घटकांचे संतुलन बिघडले होते.

आजच्या संसद मोर्चासाठी हाक

20 जुलै रोजी होणारा ’चलो संसद’ मार्च यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी रुग्णालयातून केले असून, या आंदोलनाला त्यांनी भारताची दुसरी ‘स्वातंत्र्य चळवळ’ असे म्हटले आहे.

The decision to shift Wangchuk to the hospital is indeed legal.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago