नाशिक

बाटली उभी की आडवी याचा होणार फैसला

दारूबंदीसाठी नांदुर्डी गावात 6 जानेवारीला मतदान

निफाड : तालुका प्रतिनिधी
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी नांदुर्डी येथील ग्रामपंचायत हद्दीतील दारू विक्रीचा परवाना रद्द करून अवैध दारूविक्रीही कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी 6 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्याचे परिपत्रक जारी केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निफाडचे नायब तहसीलदार राजेंद्र वराडे यांची नियुक्ती केली आहे. मतदान संपल्यावर मतमोजणी होेणार आहे. नांदुर्डीत बाटली उभी की आडवी याचा फैसला त्याच दिवशी होणार आहे.
नांदुर्डीत कायमस्वरूपी दारूविक्री बंद करावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केल्याने याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. परिणामी याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने निफाड तहसील कार्यालयास ग्रामस्थांचे मतदान घेण्याचे सूचित केले होते. परिणामी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दारूबंदी विरोधात मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. यासाठी निफाड विधानसभेसाठी वापरण्यात आलेली नांदुर्डी गावाची मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे.
मतदानासाठी जिल्हा परिषद शाळा नांदुर्डी येथील खोली क्रमांक 2,3,4 अशा तीन खोल्या वापरण्यात येणार आहे. 6 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवून, त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर मतमोजणी करण्यात येईल व निकाल घोषित करण्यात येईल.

अनेकांचे संसार उद्ध्वस्त

दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर केला. मात्र, आता मतदानात नागरिक दारूबंदीचे बाजूने मतदान करतात का, याचा फैसला निकालानंतरच समजणार आहे. सध्या या निवडणुकीचीच परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. गावातून महिलावर्ग मात्र बाटली आडवी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.

The decision will be made whether the bottle is upright or horizontal.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago