मौजे सुकेणे : प्रतिनिधी
कसबे सुकेणे (ता. निफाड) ते ओणे रोडनजीक असलेल्या बरड वस्तीवरील भाऊराव हिलम
(वय 32) पतंगांचा नायलॉन मांजा गळ्याला अडकून गंभीर जखमी झाला. सायंकाळी साडेदहाच्या सुमारास भाऊराव मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून घरी परतत असताना कसबे सुकेणे स्टॅन्ड परिसरात हा प्रकार घडला. ग्रामस्थांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करून गळ्याला दहा ते बारा टाके टाकून प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडून दिले. नशीब चांगले स्टॅन्ड परिसर गर्दीचा असल्याने तो हळू स्थितीमध्ये जात होता. गळ्याला दोरा अडकल्याने लागलीस त्याने हात लावल्याने तो वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शासन एका बाजूला नायलॉन मांजावर बंदी आणते. मात्र दुसर्या बाजूला पतंग उडवणार्या मुलांकडे हा नायलॉन मांजा येतो, कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर घटना घडल्यानंतर नागरिकांनी कसबे सुकेणे व परिसरात कोणीही नायलॉन मांजा विक्री करू नये, असे आवाहन दुकानदारांना केले आहे.
मकरसंक्रांतजवळ आल्याने लहान मुलांकडून पतंग उडवला जातो. अशा घटना घडण्याची शक्यता मोठी असते. परिसरात पतंग उडवताना पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
– आनंदराव भंडारे, सरपंच, कसबे सुकेणे
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…