नाशिक

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

1,152 शेतकरी बाधित, 482.70 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात रविवारी (दि. 29 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सात गावांतील 482.70 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 1,152 शेतकरी बाधित झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे 247 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. सलग दोन वेळा झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या पावसात कांदा, कांदा रोपवाटिका, मका, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे. पेरू व डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून, सुमारे 195 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल 28 हेक्टरवरील कांदा रोपवाटिका, 122 हेक्टरवरील गहू व सुमारे 80 हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंगळवारीही (दि.31) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

नुकसानाचा तपशील
♦ एकूण बाधित क्षेत्र : 482.70 हेक्टर

♦ बाधित शेतकरी : 1,152 4कांदा : 195 हेक्टर

♦ गहू : 122 हेक्टर

♦ भाजीपाला : 80 हेक्टर

♦ कांदा रोपवाटिका : 28 हेक्टर

शेतकर्‍यांची मागणी
♦ तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.

♦ पंचनामे जलद पूर्ण करावेत.

♦ पीकविमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ करावी.

The district has been hit by unseasonal rains.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago