नाशिक

3 लाखांची लाच घेताना जि.प अभियंता जाळ्यात

बिल मंजुरीसाठी 5.67 लाखांची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभागातील रस्ता कामाच्या बिलासाठी 5.67 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत उपविभागीय अभियंत्याला तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. दुसरा आरोपी फरार झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिटने मोठी कारवाई करत जिल्हा परिषद बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे (वय 56) यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे (वय 28) फरार झाला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फर्ममार्फत चांदवड तालुक्यातील सुमारे 72.89 लाख रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि पूर्वीच्या बिलाच्या मोबदल्यात ‘बक्षीस’ म्हणून आरोपी अधिकार्‍यांनी एकूण 5 लाख 67 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामध्ये पठाडे यांनी 3 लाख रुपये, तर देवरे यांनी 2.67 लाख रुपये मागितले होते.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 30 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयात पठाडे यांनी 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना सायंकाळी 4.45 वाजता पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल सदाशिव वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक सुरेश भिकाभाऊ शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ZP engineer caught taking bribe of Rs 3 lakh

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago