format: 3; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 3; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 295.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 3;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 34;
गौरींचे आज घरोघरी पूजन
नाशिक : प्रतिनिधी
‘आली गौराई आली सोनपावलांनी’ असे म्हणत महालक्ष्मींचे स्वागत
करण्यात आले.
सोनपावलांनी आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठांची पारंपरिक व विधिवत पूजा करून गुरुवारी (दि. 17) घराघरांत प्रतिष्ठापना करण्यात आली. माहेरवासाला तीन दिवसांसाठी गौराईंचे आगमन झाले असून, आज (दि.18) पूजन करण्यात येणार असून, शनिवारी (दि.19) निरोप देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाबरोबरच शहर आणि उपनगरांमध्ये गौरीपूजनाचा उत्साह दिसून येत आहे. आज गौराईंचे पूजन होणार असून, त्यासाठी पुरणावरणाचा तसेच सोळा भाज्या, आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.
श्री गणेशाच्या पाठोपाठ दोन दिवसांनी गौराई अर्थात महालक्ष्मींचे आगमन होते. आपापल्या परंपरेनुसार घराघरांमध्ये गौराईंची प्रतिष्ठापना केली जाते. धनधान्य, पुत्रपौत्र आणि लक्ष्मीची भरभराट व्हावी, सुखसमृद्धी, संपन्नता आणि समाधान राहावे यासाठी प्रत्येेकाच्या चालीरीतीनुसार प्रतिष्ठापना केली जाते.
माहेरवाशिणींप्रमाणे गौराईंचे स्वागत भाकरतुकडा ओवाळून करण्यात आले. औक्षण करून अंगणातील तुळशीपासून ते घरात जिथे गौराईंची स्थापना केली जाणार आहे तिथे रांगोळी आणि पावले काढून सर्व घरभर फिरविण्यात आले. हळदी कुंकवाचे ठसे आणि पावले
काढण्यात आले.
गौर आली गौर आली, विद्यालक्ष्मी आली, गौर आली गौर आली सौभाग्यलक्ष्मी आली, असे गुणगाण करत गौराईंची थाटामाटात स्थापना करण्यात आली. काल (दि. 17) गौराई स्थापनेच्या दिवशी वरण, भात, पोळी, भाजी, एक गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यात आला.
आज गौराईंच्या पूजनाला पुरणपोळी आणि सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. यावेळी फराळाचे पदार्थ अनारसे, लाडू, शंकरपाळे, करंजी, चिवडा, चकली, शेव आदी पदार्थांची तसेच विविध फळांची आरास महालक्ष्मींपुढे मांडण्यात येते. याप्रसंगी सुवासिनीप्रमाणे साडीचोळी, खणानारळाने ओटी भरली जाते. दोन सवाष्णींना भोजनास आमंत्रित केले जाते. निरोपाच्या तिसर्या दिवशी गुळवणी आणि आंबिलचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले जाणार आहे.
गौरी पूजन : 18 सप्टेंबर 2026 (ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर असल्यामुळे दिवसभरात कधीही पूजन करता येईल), गौरी विसर्जन : 19 सप्टेंबर
(सूर्योदयापासून दुपारी 3.15 वाजेपर्यंत मूळ नक्षत्रात)
महालक्ष्मींची सजावट करताना नेहमी वेगवेगळ्या थीम साकारण्याची चढाओढ असते.आपले डेकोरेशन पर्यावरणपूरक असावे यासाठी सर्वजण जागृत होत आहेत.
– सिंधू फुले, गृहिणी
The elder and younger sisters arrived at their maternal home, bringing good fortune.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…