स्वा. सावरकर थोर समाजसुधारक : बडगुजर
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगतं अग्निकुंड म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शहर आणि परिसरात साजरी करण्यात आली. भगूर येथील जन्मभूमीत सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिनव भारत मंदिर तसेच शहरातील आस्थापनांमध्ये सावरकर यांना अभिवादन करण्यात आले.
भगूरचे भूषण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर
यांनी केले.
सावतानगर (सिडको) येथे सावरकर सभागृहात स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस बडगुजर आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी सावरकरांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवताना बडगुजर बोलत होते. मातृभूमीच्या प्रेमासाठी सावरकरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. अनेक हालअपेष्टा त्यांनी सोसल्या, मात्र ब्रिटिश सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, असेही बडगुजर आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी डॉ. महेश निकम, रमेश जावरे, सुरेश होळकर, विष्णू भुरे, बाबाजी अहिरे, बापू बोरसे, अनिल कर्नावट, जगन्नाथ कुर्हे, श्रीहरी पवार, नानासाहेब निकम, आबा हिरे, भाऊसाहेब बदाने, भालचंद्र नेरकर, धोंडीराम बोडके, सविता कुंभार, कृष्णा शिरसाट, प्रकाश खिंवसरा, विजय जाधव, भारत शेळके, अल्केश पाटील, गोपीनाथ सोनवणे, वाल्मीक कदम, धनसिंग पाटील, वसंत चौधरी, साहेबराव लांडगे, अर्जुन माळी, श्रीराम जाधव, राजाराम भोसले, एकनाथ आनेराव, सावता मंडलिक, विलास किबे, हरिभाऊ आढाव, नंदकुमार गोसावी, साहेबराव कोळपे, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.
The eternal me… the infinite me
The city is filled with enthusiasm on the occasion of Swatantryaveer Savarkar Jayanti