संसदेतील कोंडीवर अमित शहा यांचे विरोधकांना थेट आव्हान

नवी दिल्ली : प्रतिनिधी
दिल्लीत विद्यार्थ्यांवरील गोळीबार, राम मंदिर देणगी चोरी आणि अन्य प्रश्नांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेल्या गदारोळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अखेर मौन सोडले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज विरोधकांकडून सातत्याने विस्कळीत केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहा यांनी विरोधकांना थेट चर्चेचे आव्हान दिले. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास आणि प्रश्नांची उत्तरे देण्यास पूर्णपणे तयार आहे, त्यामुळे विरोधकांनी संसदेत केवळ गोंधळ घालण्याऐवजी चर्चेत सहभागी व्हावे. यासोबतच, आपल्यावर केल्या जात असलेल्या ‘संसदेतून गायब’ असल्याच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण दररोज संसदेत उपस्थित आहोत, मात्र कामकाजच चालत नसल्यामुळे सभागृहात येऊन करणार तरी काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने संसदेतील ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला असून, शहा यांनी विरोधकांना चर्चेची एक निश्चित वेळ ठरवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यावे आणि चर्चेची वेळ निश्चित करावी. बुधवारी दुपारी 3 वाजेपासून ते गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही चर्चेसाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, गोळीबार किंवा इतर कोणत्याही मुद्द्यांवर सरकारकडून योग्य उत्तरे दिली जातील, याची हमी देतानाच, संसदेच्या कामकाजात अडथळा आणून जनतेच्या वेळेचा आणि पैशांचा अपव्यय करणे योग्य नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

चर्चेपासून नक्की कोण पळ काढतोय?

याच मुद्यावर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनीही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र, विरोधी पक्ष आंदोलकांवरील लाठीचार्ज, गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांच्या निवेदनावर अडून बसले आहेत. यावर अमित शहा यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले आहे की, आता देशातील जनतेनेच ठरवावे की, चर्चेपासून नक्की कोण पळ काढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकार प्रत्येक चर्चेला खंबीरपणे सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत, संसदेत जबाबदारीने वागण्याचा सल्लाही शहा यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

 

The government is ready for discussions; do not run away!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago