शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी

महानिर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराजांची मागणी

त्र्यंबकेश्वर ; प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यासाठी शासन कवडीमोलाने शेतजमीन घेत आहे. त्याला महानिर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज यांनी कडाडून विरोध केला आहे. शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी, अशी मागणी केली आहे.
अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज, सचिव श्री महंत जमनापुरी महाराज, श्री महंत रमेशपुरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा- अभिषेक केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शासनाने शेतकर्‍यांच्या आणि आखाड्यांच्या जमिनी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न करू नये. शासनाने दिलेली किंमत आणि बाजारभाव यात 100 पटींचा फरक आहे. सरकारला जमीन हवी असेल तर तेवढीच दुसरी जमीन आम्हाला द्यावी. आखाड्यांना तत्कालीन राजे-महाराजांनी जमिनी दिल्या आहेत. शासनाने त्या हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा अमृतस्नानाच्या तारखा निश्चित करताना पंचांग आणि परंपरा यांचा मेळ साधण्यात आला आहे. सिंह राशीबाबत विचार करता त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला जून 2027 पासून प्रारंभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कुशावर्ताच्या स्नानाबाबत आखडे ठाम आहेत. तथापि वाढत्या गर्दीचा विचार करता भक्तांना स्नान करण्यासाठी गोदावरी घाटाची योजना शासन करत आहे. आखाड्याचे आचार्य, महामंडलेश्वर, साधू- महंत आणि देवता पूर्वपरंपरेने कुशावर्तावर स्नान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बडा उदासीन आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत दुर्गादास महाराज, श्री महंत रामनवमी दास महाराज, मुकामी महंत दानमुनी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे ठाणापती अजयपुरी महाराज यांसह महानिर्वाणी आखाड्याचे पंडित रतीशबापू दशपुत्रे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी सर्व साधू- महंतांचे स्वागत केले. यावेळी पुजारी मनोज तुंगार, आदित्य तुंगार, सुशांत तुगार आदी उपस्थित होते.

The government should provide land in exchange for land.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *