कोकाटे यांच्याबाबतीत उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

मुंबई:

राष्ट्रवादीचे माजी मंत्री  माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. सदनिका प्रकरणात त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कोकाटे यांची अटक टळली असली तरी शिक्षेला स्थगिती दिली नाही, त्यामुळे अजून संकट कायम आहे.
सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तत्पूर्वी सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले होेते. त्यामुळे नाशिक पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी मुंबईला पोहोचले होतेे. मात्र, कोकाटे यांना उपचारार्थ लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. आज दुपारी न्यायालयात कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलाने जोरदार बाजू मांडत वेगवेगळे दाखले दिले. न्या. आर एन लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
दरम्यान, हाय कोर्टाच्या निर्णयामुळे कोकाटे यांची अटक टळली  आहे.
the-high-court-gave-this-decision-regarding-kokate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *