संपादकीय

कुसुमाग्रज स्मारकाचा संपूर्ण कायापालट होऊन लोकप्रियताही वाढवावी

– मुकुंद बाविस्कर
कोणत्याही गावाची तथा शहराची ओळख ही त्या ठिकाणी साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ किती आणि कशा प्रकारे सुरू आहे, यावरच ते शहर जिवंत असल्याचे किंवा चैतन्यमय असल्याचे समजले जाते. नाशिक नगरीबाबतदेखील असेच म्हणता येईल. एकीकडे नाशिक शहराची विकासाकडे तथा प्रगतीकडे घोडदौड सुरू असल्याचे सांगण्यात येत असतानाच या शहराची साहित्यिक व सांस्कृतिक ओळख थंडावली आहे. किंबहुना पुसली जात आहे की काय? अशीही शंका काही स्थानिक अभ्यासू मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. याला कारण म्हणजे नाशिक नगरीत पूर्वी अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम मोठ्या दोन धडाक्यात साजरे होत असत. अलीकडच्या काळात मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम तथा उपक्रम औपचारिकता म्हणून साजरे केले जात असल्याचे निदर्शनास येते. किंबहुना त्याकडे नाशिकमधील सर्व स्तरांतील नागरिक उपस्थित राहत नाहीत किंवा फिरकत नाहीत, असे दिसून येते. याला इतर कारणे काहीही असो, एक कारण निश्चित आहे ते म्हणजे, हे कार्यक्रम नाशिककरांना आपलेसे वाटत नसावेत. किंबहुना हे कार्यक्रम आयोजित करणार्‍या संस्था किंवा संघटना नाशिककरांना आपल्या वाटत नाहीत की काय? अशीदेखील शंका निर्माण होते. शहरातील नाशिक सार्वजनिक वाचनालय असो की कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यांसारख्या संस्था नाशिककरांना आपल्या वाटायला हव्यात, असे नेहमीच उघडपणे किंवा दबक्या आवाजात म्हटले जाते. मात्र, त्याचा विचार त्या संस्थांच्या कारभार्‍यांकडून होतो की नाही? अशीही शंका निर्माण होते. याला कारण म्हणजे, गेल्याच आठवड्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने वाचनालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा समारंभ होता. या कार्यक्रमाला उपस्थितांची शंभरीदेखील गाठली गेली नाही. असे का घडावे? एकेकाळी शहरात कोणताही कार्यक्रम असो, कोणतेही सभागृह असो, ते अत्यंत भरलेले असे. कारण तो कार्यक्रम नाशिककरांना आपला वाटत असे.
नाशिक नगरीमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या दोन्ही इमारती या केवळ कार्यालये नसून, ते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक केंद्र आहे. कारण येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेबांच्या आठवणी, त्यांच्या वस्तू आणि त्यांचे साहित्य जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या टिळकवाडी परिसरातील तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या निवासस्थानालगत असलेल्या के. ज. म्हात्रे सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण आणि उदघाटन सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक आयोजित कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व नगरसेवक गुरमितसिंग बग्गा यांनी सांगितले की, आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने स्मारकाचा मेकओव्हर होण्यासाठी सुमारे सात कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. राज्य शासनाने हा निधी मंजूर करावा. या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. वास्तविक यासाठी सर्वांना ठोस आश्वासनाची आवश्यकता वाटत होती. मात्र, तरीही हे काम मार्गी लागेल, अशी सर्वांना आशा आणि अपेक्षा आहे. कदाचित कुसुमाग्रज स्मारकाचा संपूर्ण कायापालट भविष्यातही होईलही. मात्र, त्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी किंबहुना कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कुसुमाग्रज स्मारक हे सर्व नाशिककरांना आपलेसे वाटण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कारण तेथे जाणारा सर्वसामान्य नागरिक हा तेथील एकूण वातावरण पाहून दपकून जातो किंवा हपकून जातो, असे म्हटले जाते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे नाशिकचे मानबिंदू होते. प्रत्येक नाशिककरांना कुसुमाग्रज हे आपलेच वाटत होते. कुसुमाग्रजांनादेखील प्रत्येक जण आपलाच वाटत होता. तसे कुसुमाग्रज प्रतिष्ठान किंवा स्मारकाच्या बाबतीत का घडत नाही, हाही एक अनाकलनीय प्रश्न आहे. नाशिककरांना तेथे मनमोकळेपणे वावरता आले पाहिजे, हीच सर्वांची अपेक्षा आहे. ती निश्चितच रास्त आहे, असेही म्हणता येईल.
डॉ. राहुल देशपांडे यांचे आगळेवेगळे व्याख्यान
भारतीय देवालये ही केवळ श्रद्धेची केंद्रे नसून, शास्त्र, विज्ञान आणि कलेचा अद्वितीय संगम आहेत. भारतीय विचारधारेत देव म्हणजे चैतन्य, स्पंदने आणि विश्वात्मकतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते डॉ. राहुल देशपांडे यांनी केले. सर डॉ. एम. एस. गोसावी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित स्मृती व्याख्यानात ते जाऊ देवाचिया गावा या विषयावर बोलत होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. व्याख्यानात डॉ. राहुल देशपांडे यांनी मूर्ती, पूजाअर्चा, देवालय या संकल्पनांचा तात्त्विक अर्थ उलगडला. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता हे मुक्तीचे चार प्रकार स्पष्ट करत भारतीय मंदिरांची वास्तुरचना, शिल्पकला, शिव, विष्णू, अष्टभुजा या मूर्तींच्या माध्यमातून प्राचीन भारतीय संकेतशास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले.
न्या. कीर्ती बागूल यांचे मार्गदर्शन
अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिकच्या वतीने कालिकादेवी मंदिर सभागृहात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात झाला. न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या कीर्ती संजय बागूल यांचा सत्कार करण्यात आला. कीर्ती बागूल यांनी न्यायव्यवस्था व स्पर्धा परीक्षेच्या विविध टप्प्यांबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रमोद जाधव यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून काम करावे, असे आवाहन केले.
वाचनालयाच्या सुसज्ज इमारतीचा सर्वांना होणार फायदा
तात्यासाहेबांच्या हयातीत 1993 मध्ये सुरू झालेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या जुन्या रचनेऐवजी आता तिथे आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त अशी नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. या नूतन वास्तूमध्ये वाचकांसाठी समृद्ध ग्रंथालयासोबतच मराठी भाषा अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमधील साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. आ. सत्यजित तांबे यांनी या इमारतीसाठी 50 लाखांचा निधी दिला. आ. देवयानी फरांदे यांनी 50 लाखांचा निधी दिला आहे.

The Kusumagraj Memorial should undergo a complete transformation and see an increase in its popularity.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago