नाशिक

शेवटचा दिवस प्रचाररॅलींनी गाजला

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. 13) अखेरचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्वच प्रभागांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी शेवटचा दिवस प्रभावी ठरावा यासाठी जोरदार तयारी केली होती. गेल्या दहा दिवसांपासून गल्लीबोळ, वसाहती आणि घरोघरी फिरून मतदारांशी थेट संपर्क साधणार्‍या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी प्रचाररॅली, पदयात्रा आणि बाइक रॅली काढत प्रचाराचा जोर वाढवला.
सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचे ताफे रस्त्यावर उतरले होते. पक्षाचे झेंडे, घोषणाफलक, ढोल-ताशे आणि जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. मतदान करा, विकासाला साथ द्या, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्या, अशा घोषणा देत मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी चौकसभा घेऊन उमेदवारांनी आपल्या आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेतला. आगामी काळातील विकासकामांची आश्वासने दिली.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात शहरात राज्यस्तरीय व बड्या नेत्यांच्या सभांमुळे प्रचाराला विशेष रंग चढला होता. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी मर्यादित कालावधी मिळाल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. मात्र, उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी काटेकोर नियोजन केले होते. सोशल मीडियाचा वापर, फोन कॉल्स, पत्रकवाटप, वाहनांवरून प्रचार यांसह प्रत्यक्ष भेटींवर विशेष भर देण्यात आला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांकडे थेट मतदानाची विनंती केली. महिलांचे, युवकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र गट तयार करून संवाद साधण्यात आला. आता शहराचे लक्ष गुरुवारच्या (दि. 15) मतदानाकडे लागले आहे.

The last day was filled with campaign rallies.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago