संगीताची जादू

– मनीषा चौधरी

हेडफोन कानाला लावले की, जणू अवघ्या जगाशी संपर्क तुटतो आणि आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो… हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच घेतला असेल. आजच्या अत्यंत तणावपूर्ण आणि वेगवान आधुनिक जीवनशैलीत ‘मानसिक शांतता’ ही चैनीची वस्तू बनली आहे. अशा वेळी, मनाला क्षणात उभारी देणारे आणि थकवा दूर करणारे एकमेव साधन म्हणजे ‘संगीत’. संगीत हा केवळ विरंगुळा नसून, तो मानवी मनाला लाभलेला एक अद्भुत विसावा आहे. ती एक अशी वैश्विक भाषा आहे, जिला समजण्यासाठी कोणत्याही लिपीची किंवा व्याकरणाची गरज नसते. जेव्हा मनातील भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात, तिथे संगीताची जादू सुरू होते…
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मानसिक शांततेचा शोध घेत असतो. प्रत्येकाची रमण्याची ठिकाणी वेगळी असतात. कारण या धावपळीच्या तणावपूर्ण आधुनिक जीवनात प्रत्येक माणसाला मानसिक शांतता ही हवीच असते. अशा वेळी ‘संगीत’ हे नक्कीच मानवी मनाला लाभलेला एक अद्भुत विसावा ठरू शकते. संगीत ही केवळ स्वरांची जुळवणी नसून, ती आत्म्याला स्पर्श करणारी एक वैश्विक भाषा आहे. जेव्हा शब्दांचे सामर्थ्य संपते, तिथे संगीताची जादू सुरू होते.
संगीतामध्ये माणसाचे दुःख हलके करण्याची आणि थकलेल्या मनाला टवटवीत करण्याची शक्ती आहे. अनुभवाअंती नक्कीच हे पटू शकते.
दिवसभराच्या कामानंतर काहींचा थकवा एखादे संथ, मधुर गाणे ऐकल्यानेही क्षणात नाहीसा होतो.तर काहींना मोठ्या आवाजातील उडती गाणी ही आनंद देऊन जातात. संगीताचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत, भावगीते, सुफी संगीत किंवा अगदी निसर्गाचे संगीत म्हणजेच वाहत्या पाण्याची झुळझुळ, पाखराची किलबिल, एका वेगळ्याच शांत दुनियेत घेऊन जाते. म्हणूनच, संगीत हे मानसिक तणावावर रामबाण उपाय मानले गेले आहे. यातूनच संगीत थेरपी हा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे.
संगीत हे प्रत्येक भावनेचा आरसा आहे. आनंदात ते आपल्या उत्साहाला द्विगुणित करते, तर दुःखाच्या प्रसंगी ते एका खर्‍या मित्रासारखे आपल्याला सांत्वन देते. आठवण, विरह, आनंद दुःख प्रेम मैत्री ममता सगळ्याच भावना संगीता मधून व्यक्त करता येतात. संगीताची भाषा समजायलाच हवी, याची गरज नसते. कारण संगीत हे कुठल्याही एका भाषेत बांधले जाऊ शकतं नाही.
संगीतामुळे मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ नावाचे संप्रेरक तयार होते, ज्यामुळे आपल्याला आनंदी आणि सुरक्षित वाटते. अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये आता ‘म्युझिक थेरपी’ म्हणजेच संगीत उपचारांचा वापर मानसिक आजार बरे करण्यासाठी केला जात आहे.
संगीत हे एकांतातला सर्वांत मोठा सोबती आहे. जेव्हा आपल्याला जगापासून दूर स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो, तेव्हा संगीत हाच आपला खरा विसावा बनतो. ते मनातील नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक ऊर्जा भरते. ऐकणारे जसे असतात, तसेच संगीताच्या तलावर थिरकणे ही आवडते अनेकांना. संगीत ही एक परंपरा आहे. संगीत हे आधुनिक असो की पौराणिक, प्रत्येकात एक अनमोल असा गोडवा आहे. प्रत्येक संगीताचा स्वतःचा एक चाहता वर्गसुद्धा आहे.
संगीत हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर तो मानवी जीवनाचा आणि मनाचा विसावा आहे. जसे शरीराला विश्रांतीची गरज असते, तशीच मनाला संगीताच्या विसाव्याची गरज असते. संगीताच्या या अथांग सागरात काही वेळ डुंबणे म्हणजेच खर्‍या शांततेचा अनुभव घेणे होय. म्हणूनच माणसांच्या सागरात असूनही, कानात हेडफोन घालून आपल्या आवडत्या संगीत विश्वात रममान झालेले अनेक संगीत प्रेमी आवतीभोवती दिसतात. चला तर,
करूयात नष्ट मनातील कचरा
संगीताच्या दुनियेत
तणावं दुःख सारं विसरा.

The Magic of Music

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *