नाशिक

व्याजाच्या रकमेसाठी सावकाराने ठेवले डांबून

नाशिकरोड येथील धक्कादायक प्रकार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात अवैध सावकारी, जबरदस्तीने डांबून ठेवणे, मारहाण व खंडणी वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव दगा पानपाटील (वय 53, रा. रामनगर, कळवण, जि. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2016 मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी चंद्रशेखर ऊर्फ पिंटू शिंदे (रा. नाशिकरोड) यांच्याकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. दरमहा दहा टक्के व्याजाने घेतलेली मूळ रक्कम एप्रिल 2017 मध्ये पूर्ण फेड करण्यात आली होती. मात्र, उर्वरित व्याज पुढील दोन महिन्यांत देण्याचे सांगूनही आरोपीने फिर्यादीकडून घेतलेल्या कोर्‍या धनादेशांपैकी एक धनादेश बँकेत टाकून तो बाउन्स करून फिर्यादीविरोधात नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल केला.
तक्रारीनुसार, व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी 13 जून 2025 रोजी आरोपी चंद्रशेखर शिंदे यांचे साथीदार बबलू ऊर्फ अभिजीत पाटील, राम गोतिसे आणि संदीप सानप यांनी फिर्यादीस नाशिकरोड न्यायालयातून जबरदस्तीने मुक्तिधाम येथील कार्यालयात नेले. तेथे सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीस डांबून ठेवत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पैसे नसतानाही मित्राकडून ऑनलाइन रक्कम उचलण्यास भाग पाडले. यानंतर राम गोतिसे याने फिर्यादीस दुचाकीवरून दत्तमंदिर सिग्नल येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमवर नेऊन जीवे मारण्याची धमकी देत 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. ही रक्कम चंद्रशेखर शिंदे याने कार्यालयात रोख स्वरूपात स्वीकारून उर्वरित दोन लाख रुपये 15 दिवसांत देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी सर्व आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केले. आमच्या विरोधात न्यायालयात पुन्हा हजर राहिल्यास कळवणला जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. या धमक्यांमुळे फिर्यादी व त्यांचे कुटुंब दहशतीखाली जीवन जगत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चंद्रशेखर ऊर्फ पिंटू शिंदे, बबलू ऊर्फ अभिजीत पाटील, राम गोतिसे, संदीप सानप व अनिल दुसाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सपकाळे व पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

The moneylender held it for interest.
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago