नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील एकलहरा मार्गावर असलेल्या अस्वले मळ्यात रविवार दि. 28 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
एकलहरे रोड ते पॉलिटेक्निक कॉलेज रोड मधील अस्वले मळ्यात मारुती मंदिराजवळ वृंदावन कॉलनीत राहणारे नितीन चंद्रभान पवार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करीत कपाट तोडून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. सासरे आजारी असल्याने शनिवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी नितीन पत्नी कांचन आणि मुलांसह संगमनेर येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. नितीन चंद्रभान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करीत आहेत.
Bears loot around 15 tolas of gold while breaking into a house in Aswale Malwa न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…