खंडणीविरोधी पथकाची कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या मोस्ट वॉन्टेड धात्रक टोळीच्या म्होरक्याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सुनील उर्फ सोन्या बाबूराव धात्रक (वय 27, व्यवसाय – मजुरी, रा. सृष्टी सोसायटी, इरीगेशन कॉलनी, मखमलाबाद, नाशिक) याला शुक्रवारी ( 20 जून 2025 रोजी) सायंकाळीच्या सुमारास शिंदे गाव, नायगाव रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चकोर यांना सोन्या धात्रक नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर विविध ठिकाणी सापळा लावण्यात आला होता.
सोन्या धात्रक हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहीजे होता. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयित अरोपी सुनिल धात्रकवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिलीप भोई, पोहवा योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोना रविंद्र दिघे, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोअं. चारूदत्त निकम, भगवान जाधव, मंगला जगताप व सविता कदम यांनी पार पाडली.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…