वणी येथील दुर्दैवी घटना
नाशिक : प्रतिनिधी
आपल्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करत स्वतःही गळफास घेऊन मातेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वणी ता. दिंडोरी येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविता विकास कराटे (33, रा. कृष्णगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या महिलेने आपली दीड वर्षांची मुलगी तनुजा विकास कराटे हिला स्कार्पच्या सहायाने गळफास देऊन जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत:ही अडगळीला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलिसांत उत्तम पुंडलीक इंगळे (रा. मोठा कोळीवाडा, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली असून भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण ऊदे, साहेबराव वडजे, किरण धुळे, हरिशचंद्र चव्हाण तपास करत आहेत.
कारण गुलदस्त्यात
आपल्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करुन या महिलेने स्वत:चा जीव का दिला याचे कारण गुलदस्त्यात आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…