मनमाडला वृद्ध महिलेचे एक लाख रुपये धूम स्टाईलने हिसकावून चोरटा फरार

मनमाडला वृद्ध महिलेचे एक लाख रुपये धूम स्टाईलने हिसकावून चोरटा फरार

मनमाड :  आमिन शेख

मनमाड शहरातील एका 58 रेल्वे पेंशनर महिलेचे सुमारे एक लाख रुपये चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावून नेल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे घटना घडल्यानंतर सदर महिला व तिच्या मुलाने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ एक पथक रवाना करून त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी आदेश दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील बारसे बिल्डिंग या ठिकाणी राहणाऱ्या निशाबाई महेंद्र जाधव वय 58 वर्ष या महिलेने आपल्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातुन पेंशनवर एकलाख पाच हजार रुपये कर्ज घेतले होते ते पैसे घेऊन त्या रिक्षाने आपल्या घराकडे जात असतानाच मनमाड शहरातील इंदुर पुणे महामार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज वरून जात असतानाच त्यांच्या रिक्षा समोर इतर गाड्या आल्याने रिक्षा हळू झाली याचवेळी मागुन मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने जाधव यांच्या मांडीवर ठेवलेली बॅग घेऊन धूम स्टाईलने येवलयाच्या दिशेने पलायन केले जाधव यांनी व रिक्षा चालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्याने धूम ठोकली जाधव यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ पोलीस टीम पाठवुन सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी आदेश दिले यानंतर येवल्याच्या पोलिसांशी संपर्क साधला मात्र कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही मनमाड शहर परिसरात गुन्हेगारी वाढत चालली असुन पोलिसांनी यावर अंकुश लावावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

होत नव्हतं सगळं गेलं…!
माझ्या नवऱ्याची पेंशन मला मिळते यातुन आमचा उदरनिर्वाह चालतो मनमाड शहरात कामाची कमतरता असल्याने मुलगा मिळेल ते काम करतो पेंशनवर एक लाख पाच हजार कर्ज घेतले होते यातील एक लाख रुपये घेऊन घरी जात असतानाच मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पैशाची पिशवी हिसकावून नेली यात माझे आधारकार्ड पॅनकार्ड बँक पासबुक घर खर्चाचे पैसे व बँकेतून काढलेले एक लाख रुपये होते हे सर्व घेऊन चोरटा पळून गेला यामुळे होत नव्हतं सगळं गेलं पोलिसांनी शहरात गस्त वाढवावी जेणेकरून इतरांसोबत असे घडू नये

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago