– विष्णू वाघ
8नवरात्रोत्सव आता सुरू होईल, या उत्सवात घटाची स्थापना प्रत्येक घरी तसेच मंदिरात केली जाते. कुंभारदादा त्यासाठी मातीपासून घट बनवतो, त्याला मराठी भाषेत गाडगे असेही म्हणतात. तेच गाडगे स्मशानात वापरले जाते आणि तेच गाडगे घट बसवण्यासाठीदेखील वापरले जाते. त्याचा फरक कवयित्री जयश्री वाघ एका कवितेत अतिशय मार्मिक करतात,
मयताच्या मडक्याला कुंभाराने घडविले, दसर्यात घट झाला हार नऊ चढविले…
एकदा का घट बसवला तर त्या ठिकाणी माती टाकून त्यात गहू टाकून घटात पाणी टाकले जाते आणि रोज एका प्रकारच्या फुलांची माळ घटाला वाहिली जाते. काळ बदलत गेला तसे फुलांचे प्रकार बदलत गेले, पण आम्ही लहान असताना घटाला निसर्गात येणार्या फुलांच्या माळी टाकल्या जात होत्या. त्यातून निसर्गातील त्या सर्व वनस्पतींचेदेखील जतन होत होते. निसर्गात सहजपणे उपलब्ध असलेले तरवडाचे सोन्यासारखे सोनेरी पिवळे फुले येणारे झाड, त्या पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण केली जायची, तरवड ही वनस्पती सहजरित्या शेताच्या बांधाला रस्त्याच्या बाजूला उपलब्ध असायची, त्यावेळेस शाळेत तरवडाची छमटी सुद्धा खूप प्रसिद्ध होती. गुरुजी शाळेत तीच छमटी वापरत असत, आता छडी आणि छमटी नामशेष झाली, निसर्गाच्या सौंदर्यात ते तरवडाचे फुले भर घालत असत. आजही काही ठिकाणी ही वनस्पती कमी प्रमाणात आहे, पण काळाच्या ओघात या निसर्गाच्या संवर्धन करणार्या वनस्पती कमी होत आहेत. त्याचे कुठेतरी जतन करण्याची आवश्यकता आहे. नवरात्रीतील नऊही दिवस या निसर्गातील वेगवेगळ्या फुलांच्याच माळा घटला वापरत असत, भेंडीच्या फुलांची दुसरी माळ भेंडीच्या झाडाला पिवळ्या रंगाची व काही भेंडीना केशरी रंगाची फुले येतात. त्या फुलांची माळ टाकले जाते, त्यानंतर निसर्गात येणारे टनटनी यालाच काही भागात दगडफूल असेही म्हणतात. त्या फुलांची माळदेखील या नवरात्रीच्या उत्सवात घटाला टाकत असे, ही वनस्पती औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांवरती त्या वनस्पतीचा उपयोग होतो. मुळव्याध, मुतखडा यांसारख्या जुनाट आजारांवरतीदेखील त्या वनस्पतीचा काही प्रमाणात उपयोग होतो. या सर्वच वनस्पतींचे जतन होणे काळाची गरज आहे.
निसर्गातील फुलांच्या माळी या नवरात्रोत्सवात वापरल्या जातात. यामागे उद्देश एकच होता आणि आहे की, निसर्गात असलेल्या प्रत्येक वनस्पती जतन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात होता. यामुळे वनस्पती जतनदेखील होत होत्या. आपणही या लुप्त होत चाललेल्या वनस्पती रुई असेल, तरवड असेल या जतन केल्या पाहिजेत. कारण पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वच प्राणी, पक्षी, वनस्पती यांची गरज असते. प्रत्येक वनस्पतीचा काहीना काही सहभाग पर्यावरण रक्षणात असतो. त्यामुळे दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती यांचे प्रत्येकाने जतन केले पाहिजे. निसर्ग साखळीत महत्त्वाच्या भूमिका त्या बजावत असतात. निसर्गात असलेल्या या फुलांचा वापर सण-उत्सवात केला जातो. यातून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयी आस्था दिसून येते. निमित्त कुठलेही असो, त्या प्रत्येक निमित्तातून निसर्ग संवर्धन कसे होईल हाच विचार पूर्वीच्या काळापासून सुरू आहे. तोच विचार आपणही एका पिढीकडून दुसर्या पिढीला देण्याची गरज आहे. आपल्या जीवनात नवरात्रीचे नऊ रंग हे वनस्पतींच्या माध्यमातून फुलवण्याचा प्रयत्न आहे. नवरात्रीत ही सर्व फुले वापरण्याची परंपरा म्हणजेच प्रत्येक वनस्पतीचे रक्षण करणे होय. मग ती वनस्पती कुठल्याही वर्गातील असो. खरं तर निसर्गातील ही फुलांची उधळण म्हणजे निसर्गाला लाभलेले वरदानच आहे.
The Nine Floral Colors of Navratri – A Gift of Nature