The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेचे 37 आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.
आमदारांना निलंबित करू शकत नाही
दरम्यान, शिंदेंसोबत असणार्या 16 आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितले जात असले तरी ते शक्य नसल्याचे आठवले म्हणाले. तो अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. 37 आमदारांचा गट दोन तृतियांश बहुमताने एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही. व्हीप सभागृहात असतो. बाहेर नसतो. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून त्यांना पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. असं त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आहे. चर्चेत त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा पक्षांतर्गत वाद आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आम्ही सध्या वेट अँड वॉचमध्ये आहोत. आम्हाला कोणतीही घाई नाही. एकनाथ शिंदेंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याच्या प्रकरणावरून रामदास आठवलेंनी टीका केली आहे. रिपाइं एकनाथ शिंदेंबाबत सहानुभूती बाळगून आहे. त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेलेले आमदार शिवसेनेकडे परत येतील अशी परिस्थिती अजिबात नाही. तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दादागिरीचं उत्तर दादागिरीनं दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदेंवर अन्याय होत असले, तर माझ्या पक्षाचे लोक त्यांच्यासोबत राहतील, असं आठवले म्हणाले आहेत.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…