राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के
नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून, राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वात जास्त ९६.७४ टक्के लागला. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.तसेच पुनर्परीक्षेचा निकाल ३७.६५ टक्के आणि दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ८,१०,३४८ मुले आणि ६,९४,६५२ मुलींचा समावेश होता. यावर्षी मुलींच्या उतीर्ण होण्याचे प्रमाण ९४.५८ टक्के तर मुलांच ८९.५१ टक्के आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ टक्के आहे. विद्यार्थ्यांना आज महाविद्यालयात गुणपत्रिका देण्यात येणार आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…