आस्वाद

तिच्या मनातलं वादळ..

– अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी
आजच्या आधुनिक जगात मुली आणि करिअर विषय समोर आल्यावर सर्वांना तर असंच वाटतं की, मुली मुलांच्या बरोबरीने प्रगती करतात. सगळीकडे धावत आहेत. हे अगदी खरं आहे पण ते किती अवघड आहे हे स्वतः करू पाहणार्‍या मुलीलाच माहिती. माझी अगदी जवळची मैत्रीण जिचा खूप चांगला शिक्षण आहे, तिची खूप बाहेर पडण्याची धडपड आहे. पण तिच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की, तिच्या सासर्‍यांची तब्येत खराब होत राहत असल्यामुळे आणि सासूबाई वारल्यामुळे तिला घरात कोणीच बघायला नाही म्हणून तिचा जॉब सोडावा लागतो आणि आधी ती त्या गोष्टीवर नाराजही होती. कारण तिची काही स्वप्न होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तिला बाहेर पडावं हे गरजेचं वाटत होतं पण पर्याय नव्हता. माझ्या मनात हा विचार आला खरंच मुलींसाठी करिअर करणे का सोपं असतं का..?
अनेकदा डिग्री पूर्ण झाल्यावर नातेवाइकांची घरच्यांची इच्छा असते की तिने लग्न करावे आणि त्यानंतर आता तिचे करिअर सेट करावे हे म्हणणं जितका सोपं असतं. तितकाच ते अवघड असतं एक तर लग्न हे खूप मोठा आणि महत्त्वाचं नातं असतं. त्या घरातल्या सगळ्या परिस्थितीशी त्या लोकांशी जुळवून घेणं आणि त्यातून स्वतःसाठी वेळ बाहेर काढून पडणं म्हणजे खूप अवघड.
त्यानंतर काही कुठे परिवाराचं सहाय्य मिळालं आणि ती बाहेर पडण्यात यशस्वी झाली जरीना तर मूलबाळे यापेक्षा श्री कडून असतात मग ते मूलबाळ झाल्यावर अनेक बदल तिच्या शरीरात होतात आणि बदलतेचे आयुष्यात होतात आणि ते सांभाळून तिला बाहेर पडणं अजून अवघड होतं. फॅमिली सोबत राहणार्‍या मुलींना तर ती मुलं सासूबाईंकडे सोडून आपलं करिअर करताही येतं त्या बाहेर पडत आहे पण तेही पाहिजे तितका अवघड असतं कारण प्रत्येक वेळेस फॅमिली ही सहकार्य करणारीच असेल असे काही अर्जंट नाही कारण ती बाहेरही पडली तरी तिने तिच्या संपूर्ण जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडावे यापेक्षा असतात आणि सोबत सासू-सासरे नसतील काही कारणास्तव ते गावाकडे असतील त्या मुलींचे तर मुलं सांभाळून करिअर करणं अगदी अवघड असतं मुलं आजारी पडली किंवा काही कारणास्तव तिला त्यांच्यासाठी सुट्ट्या मोजावे लागल्या तर तो ऑफिसचा ताण तणाव वेगळा आणि त्या मुलांना सांभाळणं त्यांना मोठे करणे हे प्रायोरिटी ही वेगळी यात तिचा नेहमीच
घुटमळ होते.
आपली काही स्वप्न आहेत धडपड आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मी बाहेर पडलं पाहिजे पण घर आणि घरातल्या जबाबदार्‍या मानसिकरीत्या भावनिकेत्या शारीरिकरीत्या खचवून थांबायला सांगतात आणि एकदा त्यातून नैराश्य येतं. अति विचार येतात पण त्यातून आवृत्ती जगत असते. पुढे जात असते, कारण आपल्या समाजात आजही पुरुषप्रधान संस्कृती वावरते आहे. पुरुषाने बाहेर पडलाच पाहिजे. त्याने कमावलं पाहिजे आणि ती स्त्रीला घरातला तो संसाराचा गाडा ओढताना आपले स्वप्न सांभाळणं जमलं तर ठीक, नाही जमलं तरी काही हरकत नाही, या विचारांमुळे कित्येकदा मनाने तर कित्येकदा मजबूरीने ती आपली स्वप्न मागे ठेवत असते.
स्त्रीला अतिशय सुंदर वरदान दिले की, ती तिच्या भावनिक रूपी संसाराच्या गाड्याला सांभाळून अगदी सुंदर पद्धतीने तिचे स्वप्नदेखील पूर्ण करण्याची कला ठेवत असते. सर्व गोष्टी मॅनेज करून पद्धतशीर आपल्या स्वप्नांना आणि संसाराला ती वेळ देण्याची तयारी ठेवत असते, पण काही गोष्टी कळत नकळत तिच्या आयुष्यात अशा घडायला लागतात. कितीदा करिअर की संसार मुलं हे ऑप्शन निवडावेच लागतात. जबाबदार आणि कर्तव्यही पार पाडलीच पाहिजे. त्याशिवाय आयुष्यात मजा नाही पण त्या मॅनेज करता करता आपल्या स्वप्नांना दाबून टाकणं ही चुकीचे थोडी मेहनत अजून घ्यावी आणि आपल्या संसारासोबत स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये आणावी. तसे नियोजन करावे जेणेकरून तुम्ही दुसर्‍यांसाठीच नाही तर स्वतःसाठी ही जगलात याचे समाधान तुम्हाला राहील.

The storm within her…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

43 minutes ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

51 minutes ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

57 minutes ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

1 hour ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

1 hour ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

1 hour ago