नाशिक

सुरगाण्यात पाऊस; भात लावणी सुरू

निकृष्ट रस्त्यामुळे घागबारीजवळ महामार्गावर चक्काजाम

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली असून, सरासरी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा व कादवा या नद्यांना पूर आला. माणसांसह पशूंच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसाअभावी रखडलेल्या भात लावण्यांना आता वेग येणार असल्याने बळीराजा
सुखावला आहे.
पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी गुजरात राज्याला जोडणार्‍या नाशिक-सापुतारा महामार्गावरील घागबारी ते सापुतारा सीमेपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नागझरी फाट्याजवळ फरशी पुलाचे काम गेल्या 3-4 महिन्यांपासून खोदून ठेवल्याने प्रशासनाने कच्चा पर्यायी रस्ता दिला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा तात्पुरता पूल व रस्ता वाहून गेल्याने 5 ते 7 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
रस्त्यात मोठमोठी वाहने, शेतकरी, शाळकरी मुले आणि रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. घागबारी, हिरीडपाडा व चिखली गावाजवळ रस्त्यावर चिखल आणि गाळ पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. प्रशासनाच्या या मनमानी आणि वेळकाढू कारभारामुळे बोरगाव परिसरातील शेतकरी व प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करावा यासाठी 9 जून 2026 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनार्दन भोये आणि बोरगाव घाटमाथ्यावरील हजारो शेतकर्‍यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातील बैठकीत अधिकार्‍यांनी एका आठवड्यात पर्यायी डांबरी रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा विश्वासघात केल्याने आज ही जीवघेणी परिस्थिती उद्भवल्याचा आरोप भोये यांनी केला आहे. येत्या काही तासांत वाहतूक सुरळीत करून पर्यायी रस्ता न दिल्यास संतप्त नागरिक व शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Rain in Surgana; paddy transplantation begins.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago