नाशिक

समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार

दुशिंगपूर शिवारातील घटना; चालक प्रसंगावधान राखत बचावला

सिन्नर : प्रतिनिधी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दुशिंगपूर शिवारात बुधवारी (दि.27) दुपारी धावत्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारमधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मदत पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार आगीत भस्मसात झाली होती.
सिन्नर येथील व्यावसायिक योगेश घुगे हे त्यांच्या टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारमधून (एमएच 15, एचवाय 5563) शिर्डीकडे जात होते. वावी पोलीस ठाणे हद्दीतील दुशिंगपूर शिवारात पाझर तलावाजवळील पूल ओलांडल्यानंतर अचानक कारच्या बोनेटमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घुगे यांनी तात्काळ कार थांबवत बाहेर पडताच काही क्षणांत आगीचा भडका उडाला.
पाहता पाहता आगीने संपूर्ण कारला वेढा घातल्याने महामार्गावर काही काळ खळबळ उडाली. मदतीसाठी घुगे यांनी महामार्गावरील वाहनांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र एकही वाहन थांबले नाही. आपत्कालीन मदतीचा संपर्क क्रमांक तत्काळ उपलब्ध न झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.
अखेर त्यांनी सिन्नरमधील मित्रांशी संपर्क साधून टोल फ्री क्रमांक मिळवला. त्यानंतर गोंदे टोलप्लाझावरील मदत पथक घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन दल व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
त्यानंतर अग्निशमन दलाने धुमसणारी आग नियंत्रणात आणली. महामार्ग वाहतूक सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख तसेच वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
झाले होते.

दीड किलोमीटर पायी चालत पोलिसांची धाव

घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल गोडे आणि विक्रम टिळे मदतीसाठी रवाना झाले. समृद्धी महामार्गाला थेट प्रवेशमार्ग नसल्याने त्यांनी पाझर तलाव परिसरातून शॉर्टकट घेतला. वाहन खाली उभे करून त्यांना सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी चालत घटनास्थळी जावे लागले.

स्थानिक अ‍ॅक्सेसची मागणी पुन्हा चर्चेत

वावी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील समृद्धी महामार्गाच्या सुमारे 30 किलोमीटर पट्ट्यात दुर्घटना घडल्यास पोलिसांना गोंदे टोलमार्गे मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. पोलिस, रुग्णवाहिका व आपत्कालीन मदत वाहनांसाठी स्थानिक अ‍ॅक्सेस उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

The thrill of burning cars on Samruddhi Highway

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago