नाशिक

रेणुकामाता यात्रोत्सवानिमित्त घोडा-बैल शर्यतीचा थरार

बक्षिसांची लयलूट; 35 सायकलींसह रोख रकमेचे वाटप

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील जागृत देवस्थान रेणुकामाता यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य अशा घोडा-बैल शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतींमध्ये नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक घोडा-बैल शौकीन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शर्यतींमुळे यात्रास्थळी मोठी गर्दी उसळली होती. या स्पर्धेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या वतीने दहा सायकली व शेतकर्‍यांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. विलास सानप यांच्या वतीने पाच सायकली, सरपंच पती दीपक बर्के यांच्या वतीने दोन सायकली, सोमनाथ सांगळे यांच्या वतीने एक सायकल तर योगेश शेळके यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली. अशा प्रकारे एकूण 35 सायकलींसह रोख रक्कम विजेत्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आली.
याशिवाय प्रत्येक टांगा शर्यतधारकाला यात्रा कमिटीच्या वतीने एक सायकल व रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. या भव्य शर्यतींचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
रेणुकामाता यात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या घोडा-बैल शर्यतींमुळे यात्रेची रंगत अधिकच वाढली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

The thrill of horse and bull racing on the occasion of Renuka Mata Yatrotsav
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago