गेल्या 27 वर्षाची परंपरा खंडीत ; यंदा गोदावरीचा राजाला ब्रेक

गेल्या 27 वर्षाची परंपरा खंडीत

यंदा गोदावरीचा राजाला ब्रेक

प्रवाशी वर्गाची रेल्वे प्रशासनावर नाराजी…!

मनमाड :  आमिन शेख

गेल्या 27 वर्षापासून मनमाड ते मुंबई असा अखंडित प्रवास करणाऱ्या गोदावरीच्या राजाला यंदा ब्रेक लागला असून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेस धुळे मुंबई झाल्याने यंदा या गाडीत गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही गेल्या 27 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेला यंदा ब्रेक लागला असून याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे भविष्यात पुन्हा मनमाड ते मुंबई ही गाडी सुरू होईल व आम्ही पुन्हा त्याच जोमाने व त्याच जोशाने व त्याच भक्तिभावाने गोदावरीच्या राजाची स्थापना करू असे मत प्रवासी संघटनेचे नरेंद्र खैरे यांनी व्यक्त केले आहे
गणेशोत्सव म्हटलं की अनेक आगळ्यावेगळ्या परंपरा महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरात बघायला मिळतात मात्र दहा दिवस रोज प्रवास करणारा राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव गणपती म्हणजे गोदावरीचा राजा होता मनमाड ते मुंबई चालणारी गोदावरी एक्सप्रेस ही गाडी केवळ एक्सप्रेस नव्हती तर मनमाड नांदगाव येवला चांदवड लासलगाव निफाड नाशिक इगतपुरी या भागातील नोकरदार विद्यार्थी शिक्षक तसेच इतर काम करणाऱ्या व खास करून मुंबईला सासर असणाऱ्या मनमाड व या भागातील महिलांची जीवन वाहिनी होती मात्र धुळे लोकसभा मतदार संघाचे तत्कालीन खासदार सुभाष आबा भामरे यांनी आपल्या पॉवर चा वापर करत मनमाड वरून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस पळवून नेली व ही गाडी धुळे ते मुंबई अशी सुरू केली यामुळे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला मात्र रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या भावनांचा विचार न करता आपला नियम कायम ठेवला यामुळे ही गाडी धुळे येथूनच सुरू राहीली मागील वर्षी रेल्वेने परवानगी नाकारली त्यामुळे नाईलाजाने रेल्वे प्रशासनाने दिलेल्या एका बोगीत मनमाडच्या यार्डात गोदावरीच्या राजाची स्थापना करण्यात आली मात्र यंदा तर तेही बंद झाले व गेल्या 27 वर्षापासून सुरू असलेली परंपरा यंदा मोडीत निघाली रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ धोरण तसेच लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यामुळे गोदावरीच्या राजाचा प्रवास थांबला यामुळे या गाडीत रोज अपडाऊन करणारे चाकर माने व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे ही गाडी सुरू व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली खासदार आमदार रेल्वेमंत्री रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता ही गाडी मनमाडवरून बंद करून धुळे इथून सुरू केलेली आहे

भविष्यात पुन्हा गोदावरीच्या राजाची स्थापना करू
मनमाड येथून मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस बंद करून ती धुळे इथून सुरू करण्यात आली आहे यासाठी आम्ही अनेक निवेदने आंदोलने केलेली आहेत मात्र रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळ अद्याप ही गाडी धुळे येथून सुटत आहे मात्र आम्हाला विश्वास आहे भविष्यात गोदावरी एक्सप्रेस पुन्हा मनमाड येथून सुरू करण्यात येईल त्यावेळी आम्ही पुन्हा गोदावरीच्या राजाची मोठ्या जल्लोषात स्थापना करू गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथून सुरू व्हावी यासाठी आमच्या संघटनेतर्फे लढा सुरूच आहे
नरेंद्र खैरे प्रवासी संघटना सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *