नाशिक

वाहतूक पोलिसांनीच बुजवले रस्त्याचे खड्डे

पंचवटी : वार्ताहर
एकीकडे वाहतूक पोलिसांच्या नावाने बोट दाखवले जात असतानाच, वाहतूक शाखेत असेही कर्मचारी आहेत की, ते आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक कर्तव्याचे भान जपत आहेत. बळी मंदिर परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बळी मंदिर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी
बुजवले.
शहर परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यातच बळी मंदिर चौकातील चौफुलीवर वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक कर्मचार्‍यांना चांगलीच कसरत करावी लागते. परंतु, याच भागातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांनादेखील त्रास सहन करावा लागत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बळी मंदिर चौकातील कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार विशाल बधाने, सोपान पवार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना रस्त्यावरील खड्डे बुजवले.त्यामुळे परिसरातील नागरिकांनीदेखील त्यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

25 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

44 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

51 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

60 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago