महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनापासून चालकांना मराठी सक्ती

परिवहनमंत्री सरनाईक : टॅक्सी-रिक्षा चालकांचा समावेश

मुंबई :
आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत दिली. आता मुदत देणार नाही. राज्य सरकारकडून अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ज्यांना मराठी बोलता येणार नाही, त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
105 दिवसांमध्ये ज्या
अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान घेता आले अशा चालकांवर कारवाई होणार नाही, असे सरनाईक म्हणाले. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतील भाषा बोलता येणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय करणार्‍या चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असा आग्रह केला आहे. राज्य सरकारने सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी अनिवार्य केली आहे. राज्य सरकारने अमराठी चालकांना मराठी बोलता यावी, यासाठी आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यानंतर आता राज्य सरकारकडून येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून मराठी बोलता न येणार्‍या किंवा उद्दामपणे मराठी बोलण्यास टाळाटाळ करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. आता मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देणार नाही, असे स्वत: परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे याबाबत आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणे
महत्त्वाचे ठरणार आहे. ही जबाबदारी आमची नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी
अनिवार्य आहे.

मराठीची शंभर टक्के सक्ती करणार

मराठीचे जुजबी ज्ञान हे यायलाच हवे. तेवढी मराठी तुम्ही शिकायलाच हवी. ही जबाबदारी आमची नाही. पण मानवतावादी दृष्टिकोनातून राज्य सरकारने जबाबदारी उचलली होती आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवत आहोत. चालकांसाठी वर्गही घेतले. तीन महिन्यांपूर्वीच राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य होणार होती. पण काही चालक संघटनांनी मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आला. विशेष म्हणजे, राज्य सरकारने अमराठी चालकांसाठी मराठी भाषा यावी यासाठी मराठी भाषेचे वर्गदेखील घेतले.

Marathi mandatory for drivers starting from Independence Day.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago