विभागीय आयुक्तांना महापालिकेचे पत्र
नाशिक : प्रतिनिधी
प्रभाग सभापती निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महापालिका प्रशसनाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पत्र देत सदर निवडणुकीसाठी वेळ व तारीख ठरवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत प्रभाग सभापती निवडणुकीचा बिगुल वाजणार आहेे.
नाशिक महापालिकेत नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर व नवीन नाशिक (सिडको) अशा सहा प्रभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. जानेवारीमध्ये नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन महापौर, उपमहापौर व स्थायी सभापतींची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रभाग सभापतींच्या निवडीला मुहूर्त कधी लागणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने हालचाली सुरू करत दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना प्रभाग सभापतिपदांसाठी तारीख ठरवण्याची मागणी केली आहे. ही निवडणूक महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आणि इतर समित्यांच्या सभापतींंची निवडणूक घेणेमध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीचे कामकाज केले जाते.
सहाही प्रभागांचे सभापती, प्रभाग समितींची निवड करण्याबाबतचा कार्यक्रमाचा वार, दिनांक व वेळ निश्चित करून देण्याची विनंती
महापालिकेने केली आहे. प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक विभागीय आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी घेईल. या निवडणुकीसाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी असावा लागतो.
भाजपचाच दबदबा
पक्षनिहाय बलाबल पाहिल्यास नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको, पूर्व या चार विभागांत भाजपचा दबदबा आहे. मात्र, भाजपला नाशिकरोड, नवीन नाशिक आणि पूर्वमध्ये प्रभाग समित्यांसाठी शिंदेसेनेशी तडजोड करावी लागेल.
The trumpet of the ward chairman election will sound soon.