शहर अभियंत्यांच्या पत्रामुळे उलटसुलट चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कामांना अडथळे येत असल्याची तक्रार कंत्राटदाराने केल्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारी नगरसेवकांसह व काही झेरॉक्स नगरसेवकांना चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावले होते. यानंतर शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, सदर प्रकरण ताजे असतानाच, मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सायंकाळी पत्र काढत सदरची कामे त्या त्या परिसरात तेथील नगरसेवकांच्या सहकार्याने होत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील दोघा नगरसेवकांसह झेरॉक्स नगरसेवकांनी कंत्राटदाराला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने थेट मनपा आयुक्त यांना पत्र देत कामाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका क्षेत्रात विविध कामे सुरू आहेत. सदरची कामे त्या त्या परिसरातील विविध सन्माननीय सदस्यांचे सहकार्य तसेच समन्वय साधून प्रगतीत आहेत. सन्माननीय सदस्य, अधिकारी आणि कामाचे मक्तेदार यांच्या समन्वयाने सदरची कामे विहित पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे प्रगतीत आहेत. सन्माननीय सदस्य आणि मक्तेदार यांच्यात कुठल्याही प्रकारचा गैरसमज नसल्याने शहर अभियंत्यांनी
म्हटले आहे.
गुरुवारी झालेल्या स्थायी सभेत नगरसेवक राहुल दिवे यांनी ठेकेदार हे प्रशासनाच्या मदतीने नगरसेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही तासांनीच पोलिसांनी सिंहस्थ कामात अडथळा करणार्यांना पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सिंहस्थ कामातील अडथळे खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्जड दम देत संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
There is no dispute between the monopolist and the municipal workers.