‘कार्पोरेट जिहाद’वर मंत्री महाजन आक्रमक; रॅकेट असण्याची शक्यता
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकमधील नामांकित कंपनीत धर्मांतराच्या नावाखाली मुली, महिलांना नोकरीचे, मोठ्या पगाराचे आमिष दाखविले जात आहे. अतिशय घृणास्पद असे प्रकार सुरू आहेत. देवदेवतांबद्दल अतिशय वाईट बोलले जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नाशिक पोलिसांनी धाडसाने हे प्रकरण पुढे आणले आहे. त्याबद्दल नाशिक पोलिसांचे कौतुकच आहे. या संदर्भात सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याती मोठी असू शकते. त्याबाबत सर्व चौकशी सुरू असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धर्मांतर प्रकरणावर ते आक्रमक झाले होते.
नाशिकमध्ये धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मंत्री महाजन यांनी काल नाशिक दौर्यादरम्यान पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली.
नाशिकमधील मोठ्या कार्पोरेट कंपनीत मुली-महिलांवरील अत्याचाराच्या घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता मंत्र्यांनी व्यक्त केली. मुलींना गोमांस खायला घालणे, रोजे (उपवास) करायला लावणे, नमाज पढायला लावायचे, त्यांना धर्मांतर करायला लावायचे हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. असा प्रकार इतर कंपन्यांतही सुरू आहे का याबाबत नाशिक पोलीस आयुक्तांंना चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
पीडितांनी पुढे यावे, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. अतिशय गांभीर्याने हा विषय घेत जे या प्रकरणात दोषी आहेत अशांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे धर्मांतर किंवा मुली-महिलांना फसवण्याचे, अत्याचार करण्याचे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, अशी कारवाई करणार असल्याचे महाजनांनी सांगितले.
अशा प्रकारचे रॅकेट असल्याचा संशय महाजन यांनी व्यक्त केला. मुलींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू होते. यासंदर्भात कसून चौकशी सुरू असून, कोणालाही माफी दिली जाणार नाही, असे महाजनांनी स्पष्ट केले. मुलीच नाही, तर मुलांचेही धर्मातर करण्याचे प्रकार वाढले आहेत. पीडितांनी तक्रार दाखल करण्यास पुढे येण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. अशा आस्थापनांत विशाखा समिती नेमलेल्या असून, त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. याबाबतीत विशाखा समितीलाही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचे महाजनांनी सांगितले.
भोंदू अशोक खरातप्रकरणी एसआयटी सखोल तपासणी करीत आहे.धर्मार्ंतर, तसेच धर्मगुरू म्हणून चाललेले प्रकरण अतिशय गंभीर असून, 160 रील्स समोर आल्या आहेत. अशा भोंदू लोकांचा कडक बंदोबस्त झाला पाहिजे जेणेकरून पुढे अशी भोंदूगिरी किंवा धमार्ंतरासारखे प्रयोग करायची हिंमत कोणाची झाली नाही पाहिजे, अशी शिक्षा झाली पाहिजे, असेही महाजनांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कामात अडथळा आणणार्यांवर कारवाई
शहरातील सिंहस्थातील कामांबाबत कोणीही अडथळा आणायचा नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. तशा सूूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या असून, यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जिथे चूक असेल त्याबाबतीत कोणत्याही पक्षाचे असले, तरी ते तपासले जाईल. नगरसेवक, ठेकेदार व आयुक्तांना सोबत घेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Abominable acts in the name of conversion