उबाठा गटाला निफाड आणि दिंडोरी तालुक्यात मोठे भगदाड
२०० हून अधिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाला मोठे भगदाड पाडण्यात शिवसेनेला यश मिळाले असून उबाठा गटाच्या २०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री . ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात शनिवारी प्रवेश केला. यावेळी, शिवसेना सचिव . भाऊसाहेब चौधरी साहेब, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, राजू लवटे, ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे उपस्थित होते.