अधिकच्या एबी फॉर्ममुळे उमेदवारी अर्ज बाद; समर्थकांचा मात्र संताप
प्रभाग क्रमांक 18, 24, 25, 26, 29 व 30 मध्ये एबी फॉर्म दोन उमेदवारांना दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पक्षाची मोठी कोंडी झाली. नियमानुसार एका प्रभागात एकाच उमेदवाराची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी हस्तक्षेप करत काही उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध ठरविले आहेत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपकडून भाग्यश्री ढोेमसे, संगीता पाटील, हर्षा बडगुजर आणि साधना मटाले यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, यातील निवडणूक निर्णय अधिकार्यांनी भाग्यश्री ढोेमसे व संगीता पाटील यांचा एबी फॉर्म अवैध ठरविला. याप्रकरणी भाग्यश्री ढोेमसे आणि रवी पाटील यांनी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना थेट जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वादविवाद झाला. त्यामुळे वातावरण तापले होते. प्रभाग क्रमांक 24 ’अ’मध्ये भाजपने पल्लवी राहुल गणोरे आणि सुरेखा नेरकर या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते; परंतु छाननीत चार मिनिटे अगोदर फॉर्म जमा केल्याने पल्लवी गणोरे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आणि नेरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. जेलरोड येथील प्रभाग 18 मधील शिंदेसेनेतर्फे रंजना बोराडे व शीतल ताकाटे यांना ओबीसी प्रवर्गासाठी एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, बोराडे यांनी आधी अर्ज भरल्याने त्यांचा अर्ज वैध गृहीत धरण्यात आला. शीतल ताकाटे यांचा अर्ज बाद केला गेला.
दरम्यान, यामुळे शिंदेसेनेत अंतर्गत वाद पेटला आहे. अधिकृत एबी फॉर्म आपल्यालाच मिळाला होता मात्र, तो दुसर्या उमेदवाने तो चोरल्याचा आरोप शिवा ताकाटे यांनी करत आपण पूर्ण पॅनलच अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रभाग 30 मध्ये उबाठा गटाने निशिकांत जाधव व नीलेश साळुंखे यांना एबी फॉर्म दिला होता. पण जाधव यांनी अगोदर फॉर्म जमा केल्याने त्यांचा अर्ज वैध, तर साळुंखे यांचा अर्ज बाद करण्यात येऊन त्यांना अपक्ष घोषित करण्यात आले.
BJP-Shinde Sena and Ubatha’s AB form confusion
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…