सिन्नर : प्रतिनिधी
मढी येथील कानिफनाथांचे दर्शन घेऊन घराकडे परतणार्या सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील तिघांचा सोनईजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. समोरून येणार्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात सियाज कार मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात सुमारे 25 ते 30 फूट खोल कोसळली. बुधवारी (दि. 21) दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. या घटनेमुळे कासारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
भाऊसाहेब कोंडाजी रणधीर (वय 50), केरू रामभाऊ पवार (60) आणि सुभाष रामभाऊ बिडवे (60), अशी मृतांची नावे आहेत. कारचालक संदीप सदाशिव कदम (वय 43) जखमी झाले आहेत. कासारवाडी येथील हे चौघे बुधवारी गावातील एका मित्राच्या सियाज कारमधून (एमएच 03- बीडब्ल्यू 7884) मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते सोनईच्या दिशेने परतत असताना सोनई (ता. नेवासा) शिवारातील सोनई-घोडेगाव रस्त्यावर मुळा धरणाच्या पुलाजवळ अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकून थेट कालव्यात कोसळली. कालव्यात दहा ते पंधरा फूट पाणी असल्यामुळे कार पूर्ण पणे पाण्यात बुडाली. चालक संदीप कदम यांनी प्रसंगावधान राखून दरवाजा उघडून पाण्याबाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, इतर तिघांना कारबाहेर पडता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
गावावर शोककळा
तिघेही मृत कासारवाडी येथील असल्याचे स्पष्ट झाले. एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने कासारवाडीत हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या नातेवाइकांनी संध्याकाळी उशिरा सोनईकडे धाव घेतली. या दुर्घटनेमुळे कासारवाडी परिसरात शोककळा पसरली होती.
Three people from Kasarwadi die in a car accident
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…