उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींना त्वरित अटक करण्याची रहिवाशांची मागणी
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
विजयादशमीच्या पहाटे नाशिकरोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघा टवाळखोरांनी कोयत्यांच्या जोरावर चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींचा शोध घेत आहे.
नवरात्रोत्सवाचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्व ठिकाणी विविध मंडळांनी दांडिया रासचे कार्यक्रम आयोजित केले होते. दांडिया रासची धामधूम रात्री बारा वाजेला संपल्यानंतर सर्वजण घरी साखरझोपेत असतानाच, पहाटेच्या सुमारास दुचाकी अॅक्टिव्हा गाडीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. त्यानंतर डावखरवाडी येथे राहणारे बाळासाहेब डावकर यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर जवळच असलेल्या सद्गुरूनगर येथे राहणारे अभिषेक जाधव यांच्या घराबाहेर उभी असलेली मारुती कार या गाडीच्यासुद्धा तसेच धोंगडेनगर येथे राहणारे प्रशांत भालेराव यांची स्विफ्ट कार या गाडीच्यादेखील काचा फोडल्या. त्यानंतर या गुंडांनी आपला मोर्चा मालधक्का रोड येथे वळविला. त्या ठिकाणी राहणारे मनपा कर्मचारी बिरडे यांच्या चारचाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.
या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, नाशिकरोडची गुन्हेगारी थांबणार तरी कधी? असा सवाल व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजताच शिवसेना ठाकरे गटाचे अतुल धोंगडे व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील रहिवाशांना दिलासा दिला. आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करा, अशी मागणी केली. शिवसेना शिंदे गटाचे विक्रम कदम यांनीसुद्धा संबंधित आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली असून, सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, उपनिरीक्षक सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
दोनच दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या भाईची मिरवणूक काढणार्या समर्थकांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली होती. यामुळे गुंडांना वचक बसेल असे वाटत होते. मात्र, गुंडांनी गाड्यांची तोडफोड करून एकप्रकारे पोलिसांना आवाहन दिल्याची चर्चा नाशिकरोडमध्ये आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…